शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्प अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: January 29, 2017 23:03 IST

एसपीव्हीचा मुद्दा : निवडणूक प्रचारात विरोधकांकडून भाजपाला घेरण्याची शक्यता; गोदावरी सुशोभिकरणाचाही मुद्दा

नाशिक : देशातील शंभर शहरे स्मार्ट करण्याचा मोदी सरकारचा अजेंडा असला तरी नाशिकला स्मार्ट सिटी करण्याबाबत तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तयार केलेल्या प्रकल्प आराखड्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, एसपीव्ही अर्थात कंपनीकरणाचा मुद्दा महापालिका निवडणुकीत पुन्हा उचल खाण्याची चिन्हे असून, त्यातून स्वायत्ततेचा प्रश्नही चर्चिला जाण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशातील शंभर शहरांना स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विकसित करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार ९८ शहरांच्या यादीत नाशिक शहराचाही समावेश करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात २० शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश होण्यासाठी नाशिक महापालिकेने तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प आराखडा तयार केला होता. त्यासाठी शहरभर स्मार्ट सिटीचा जागर घडवून आणला गेला होता. लोकसहभाग घेत काही नावीन्यपूर्ण प्रकल्पांची चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार, गेडाम यांनी हरित क्षेत्र, पुनर्विकास आणि विशेष क्षेत्र विकास या अंतर्गत प्रकल्प आराखडा तयार करत शहर विकासाची अनेक स्वप्ने दाखविली होती. त्यात जुन्या नाशिक गावठाण परिसराचा पुनर्विकास करण्यापासून ते गोदावरी नदीपात्रालगत सुशोभिकरणापर्यंतचा समावेश होता. परंतु, स्मार्ट सिटी अभियानात सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र कंपनी अर्थात एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) स्थापन करणे अनिवार्य होते आणि त्यात लोकप्रतिनिधींना फारसे स्थान नव्हते. त्यामुळे महासभेत भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी कंपनीकरणाला तीव्र विरोध दर्शविला होता. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही स्मार्ट सिटीवर कडाडून प्रहार केले होते. परंतु, जादूची कांडी फिरली, मनसेचाही विरोध मावळला आणि काही अटी-शर्तींवर स्मार्ट सिटीसाठी कंपनीकरणाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करण्यात आला आणि सध्या कंपनी स्थापनेची कार्यवाही सुरू आहे.  महापालिका निवडणुकीत भाजपाकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समर्थन केले जाईल, परंतु विरोधकांनी मात्र, स्मार्ट सिटीचा फोलपणा मतदारांसमोर मांडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पुणे व सोलापूर शहराचे उदाहरण समोर ठेवले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शहरांत  तब्बल दीड वर्ष उलटूनही अद्याप विकासाच्या पाऊलखुणा उमटलेल्या  नाहीत. (प्रतिनिधी)