शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

येवल्यात पारितोषिक वितरण

By admin | Updated: January 8, 2017 01:01 IST

गणेशोत्सव स्पर्धा : बावीस मंडळांचा यथोचित गौरव

येवला : शहरात शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून सर्वच स्तरांतून प्रयत्न करण्यात येतात यादृष्टीने यावर्षी पोलीस विभागातर्फे जातीय सलोखा प्रस्थापित करून आनंदाने धार्मिक उत्सव साजरे व्हावेत यासाठी सामाजिक सद्भाव गणेशोत्सव चषक स्पर्धेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला.सामाजिक सद्भाव स्पर्धेत येवला शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एकूण बावीस मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी रायगड ग्रुप, एन्झोकेम विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय, जनता विद्यालय, पैलवान राजेंद्र लोणारी, अविनाश कुक्कर, राजू पवार, डॉ. भूषण शिनकर, अमोल शिंदे, काझी राफिउिद्दन, परदेशपुरा तालीम संघ, सहारा हॉटेलचे संचालक, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने रोख बक्षिसे ठेवण्यात आली होती. प्रत्येक इव्हेंटसाठी ५५०० रु., ३३०० रु., २१०० अशी रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. मनमाड पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, नगरसेवक सचिन शिंदे, गणेश शिंदे, राजेंद्र लोणारी, रुपेश लोणारी, सचिन मोरे, प्रशांत शिंदे, प्रमोद तक्ते यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. परदेशपुरा तालीम संघाच्या शेवटच्या मानाच्या गणपती मंडळाचे प्रमुख प्रेमसिंग परदेशी यांनी २२ गणेश मंडळांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. प्रास्ताविकात पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी जातीय सलोखा राखत गणेशोत्सवासह सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पडून पोलीस विभागाला सहकार्य केल्याची आठवण देऊन आगामी संक्रांत उत्सवाचा बेरंग होऊ नये म्हणून नायलॉन मांजाचा वापर होऊ नये म्हणून पोलिसांनी थेट तपासणी करून गुन्हे दाखल केले आहेत. नायलॉन दोरा न वापण्याचे आवाहन केले पाटील यांनी केले. यावेळी माणिकराव शिंदे यांचे भाषण झाले. पोलीस दलातील अधिकारी सोमनाथ लोंढे, रामदास बैरागी, अभिमन्यू आहेर यांचा चांगल्या कामानिमित्त गौरव करण्यात आला. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)