शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
2
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
3
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
4
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
5
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
6
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
8
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
9
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
10
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
11
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
12
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
13
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
14
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
15
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
16
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
17
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
18
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
19
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
20
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज

राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: January 9, 2017 00:56 IST

घोटी गट : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सर करण्यासाठी सारेच सरसावले

सुनील शिंदे घोटीतालुक्याच्या राजकारणाची उलथापालथ करणारे आणि राजकीय केंद्र असलेल्या घोटी गटाचे या निवडणुकीत इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या गटाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी शिवसेनेने बाबूलाल भोर यांच्या रूपाने ताब्यात घेतलेल्या या गटात नंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने या गटात प्रचंड मुसंडी मारीत आजपर्यंत हा गट आपल्या ताब्यात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला अबाधित ठेवला आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय जाधव यांच्यानंतर माजी आमदार शिवराम झोले व त्यानंतर अलका जाधव यांनी या गटाचे प्रतिनिधित्व केले. याचीच दखल घेत या गटातील जिल्हा परिषद सदस्या अलका जाधव यांना जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती होण्याचा मान मिळाला. या संधीचे सोने करीत त्यांनी गटासाठी जिल्हा परिषदेमार्फत विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देत, गटातील ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे निर्माण केले.या निवडणुकीतही पारंपरिक राष्ट्रवादी व शिवसेनेबरोबर महाराष्ट्र नविनर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या प्रमुख पक्षासह अनेक अपक्षांनी या गटात लढण्याची तयारी केली आहे. सर्व इच्छुकांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरु वात केली आहे. यादृष्टीने राजकीय पक्षांनी घोटी शहराला केंद्रस्थानी मानून शहरातच गटाचे आणि गणाच्या आढावा बैठका, कार्यकर्ता मेळावा घेण्यात येत आहे.विकासाच्या मुद्द्यावर निवडणूकतालुक्यातील पाच गटांपैकी घोटी व शिरसाटे या गटात अपेक्षित विकास कामे झाली असतानाही आगामी निवडणूक विकास या एका मुद्द्यावर लढली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गेली पाच वर्षांतील गटात केलेल्या विकास कामाना विविध माध्यम, सोशल मीडिया, माहिती पुस्तिका आदिमार्फत गटातील मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.शिवसेनेने घोटी ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली विकास कामे जनतेसमोर सादर करून मतदाराना विशेषत: घोटी शहरातील जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, मनसे व भारतीय जनता पक्षही विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.आमदार निर्मला गावित यांनीही गेली सात ते आठ वर्षांपासून तालुक्यात आणलेल्या विकासपर्वाचे या गटातील इच्छुक काँगेस उमेदवार फायदा घेणार आहे.