नाशिक : गृहखात्याने राज्यातील १०१ पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक पोलीस आयुक्तालयाचे मोहन ठाकूर यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात चार अधिकारी बदलून येत आहेत.सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांची अकादमीत उपअधीक्षकपदी बदली झाली असून, गडचिरोली येथून रामसिंग साळवे हे ग्रामीण पोलीस दलात मनमाड विभागासाठी येत आहेत. तर मंगेश चव्हाण हे सोलापूरहून मालेगाव कॅम्प विभागासाठी, मुंबई येथून प्रदीप जाधव व पुणे येथून समीर नजीर शेख यांची नाशिक आयुक्तालयात नेमणूक झाली आहे.
राज्यातील पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 01:26 IST