सिन्नर : पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची देयके पीएफएमएस या अत्याधुनिक प्रणालीद्वारे अदा करण्यात येत असून सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालक यांच्यासाठी ही प्रणाली नवीन आहे. त्यामुळे त्यातून काही चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही आधुनिक प्रणाली सरपंच, ग्रामसेवक आणि केंद्रचालकांनी काळजीपूर्वक हाताळावी, विकासकामांची टेंडर प्रक्रिया बिनचूक राबवावी, देयके अदा करताना पुरेशी काळजी घ्यावी, अशा सूचना आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महेंद्र पगारे यांनी केली.
पीएफएमएस प्रणालीसंदर्भात व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या डिजिटल सिग्नेचर (डीएससी) हाताळणीसंदर्भात सरपंचांना मार्गदर्शनाची गरज असल्याची बाब सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष योगेश घोटेकर, उपाध्यक्ष डॉ. रवींद्र पवार, सचिव मंजुश्री घोटेकर, सदस्य प्रभाकर हरक, रतन नाठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व केंद्र चालक यांच्यासाठी पंधराव्या वित्त आयोग आणि पीएफएमएस प्रणालीसंदर्भात गटविकास अधिकारी मुरकुटे यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. केंद्र शासनाकडून ग्रामपंचायतींना येणारा पंधराव्या वित्त आयोगाचा निधी यापुढे पीएफएमएस प्रणालीद्वारे खर्च करावयाचा असून, सरपंच (चेकर) व ग्रामसेवक / ग्रामविकास (मेकर) अधिकारी यांच्या डीएससीनेच हा खर्च होणार आहे. यापुढे चेकने होणारे सर्व व्यवहार आता पीएफएमएस प्रणालीद्वारे केले जाणार असून, यामध्ये ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची भूमिका व पीएफएमएस प्रणालीचे फायदे याविषयी पगारे, तालुका व्यवस्थापक सोपान सहाणे यांनी मार्गदर्शन केले.
फोटो ओळी- २७ सिन्नर ३ पीएफएमएस
सिन्नर पंचायत समितीत पीएफएमएस प्रणालीसंदर्भात सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालकांना मार्गदर्शन करताना महेंद्र पगारे.
270721\27nsk_22_27072021_13.jpg
सिन्नर पंचायत समितीत पीएफएमएस प्रणालीसंदर्भात सरपंच, ग्रामसेवक, केंद्रचालकांना मार्गदर्शन करताना महेंद्र पगारे.