आरटीई प्रवेशप्रक्रियेंतर्गत राज्यस्तरावरून सोडत जाहीर झाल्यानंतर कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू होण्याला विलंब झाला. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यानुसार आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांत केवळ १७६ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर आर्थिक व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. शहर व जिल्ह्यातील ४५० शाळांनी नोंदणी केली असून, त्यात ४ हजार ५४४ जागा आहेत. साेडतीत ४ हजार २०८ विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यांच्या प्रवेशप्रक्रियेनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना फेरीनिहाय प्रवेश दिला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीत संधी मिळाली, त्यांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक असेल.
इन्फो-
आतापर्यंतचे प्रवेश
जिल्ह्यातील शाळा - ४५०
उपलब्ध जागा - ४,५४४
प्रवेशासाठी अर्ज - १३,३३०
लॉटरीत निवड- ४,२०८
प्रवेश निश्चित - १७६