या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महिला व बाल विकासचे प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, तर अध्यक्षस्थानी सरपंच तारा बांबळे व उपसरपंच रामचंद्र परदेशी, पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे उपस्थित होते.
स्वागतगीत अनिता गायकवाड व वर्षा चोथवे यांनी गायले, तर ''''पोषण आहार साजरा करा गं बाई'''' हे गीत तारा परदेशी यांनी गायले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांनी पोषण आहारासंदर्भात मनोगत व्यक्त केले. यानंतर परदेशी, रतन बांबळे, प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, टाकेद बिटात एकूण ३४ अंगणवाडी केंद्रांमधील सेविका व मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य सतीश बांबळे, राम शिंदे, लता लहामटे, अशोक बांबळे, गणपत भांगे, टाकेद पूर्वा दातरंगे, गणेश दुर्गुडे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी बिटाच्या पर्यवेक्षिका पूर्वा दातरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत टाकेद येथील अंगणवाडी सेविका अनिता गायकवाड, सुनीता जाधव, तारा परदेशी, रिता परदेशी, सुनीता भांगे, अनिता खामकर, बशाबाई लोहकरे, ज्योती भवारी यांनी केले होते. सूत्रसंचालन कावेरी परदेशी, वर्षा चोथवे यांनी केले. आभार मंगल डोळस यांनी मानले.
याप्रसंगी आशा भालेराव, सीता साबळे, सुमन मराडे, राजुबाई घोेडे, सकुबाई गागरे, शीला लगड, इंदुबाई कुंदे, बापू जाधव, किशोर पवार, नागरे, आदी उपस्थित होते.
(२२ टाकेद)
पोषण अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पंडित वाकडे समवेत तारा बांबळे, रामचंद्र परदेशी, राम शिंदे, अविनाश दातरंगे, सतीश बांबळे, आदी.
220921\242822nsk_53_22092021_13.jpg
पोषण अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना पंडित वाकडे समवेत तारा बांबळे, रामचंद्र परदेशी, राम शिंदे, अविनाश दातरंगे सतीश बांबळे आदी.