शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे शंभर कोटींची तूट?

By admin | Updated: April 1, 2017 01:32 IST

नाशिक : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने १३३८.३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते परंतु मार्चअखेरपर्यंत उत्पन्न सुमारे १२३० ते १२४० कोटी रुपयांपर्यंतच जाण्याची शक्यता आहे.

नाशिक : सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने १३३८.३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते परंतु मार्चअखेरपर्यंत प्राप्त वसुलीची स्थिती पाहता उत्पन्न सुमारे १२३० ते १२४० कोटी रुपयांपर्यंतच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे शंभर कोटींची तूट येण्याची शक्यता असून, विविध कामांच्या आणि प्रकल्पांच्या देयकांचे ओझे मात्र वाढतेच आहे. दरम्यान, आर्थिक स्थिती खालावलेल्या महापालिकेवर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शुक्रवारी (दि. ३१) २५ कोटी रुपयांची मुदत ठेव मोडण्याची नामुष्की आली. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी १३५८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. त्याचवेळी आयुक्तांनी १३३८.३५ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरले होते. मात्र, २७ मार्च २०१७ अखेरपर्यंत महापालिकेला एलबीटीसह विविध करांच्या माध्यमातून ९८६.३२ कोटी रुपये तर इतर करांच्या माध्यमातून १८४.४८ कोटी रुपये याप्रमाणे एकूण ११७०.८१ कोटी रुपयेच उत्पन्न हाती पडू शकले आहे. ३१ मार्चअखेरपर्यंत सदर उत्पन्नात फार तर ६० ते ७० कोटींची भर पडू शकते. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न १२३० ते १२४० कोटी रुपयांपर्यंतच जाऊन पोहोचू शकते. म्हणजेच अपेक्षित उत्पन्नापेक्षा सुमारे शंभर कोटींची तूट येणार आहे. मार्चअखेरपर्यंत विविध ठेकेदारांची सुमारे ७० कोटींची देयके अद्याप बाकी आहेत. याशिवाय, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठीही महापालिकेला स्वत:चा हिस्सा म्हणून सुमारे २०० कोटी रुपये देणे अनिवार्य आहे. त्यामध्ये स्मार्ट सिटी अभियानासाठी ४५ कोटी, मुकणे प्रकल्पासाठी ५० कोटी, जेएनयूआरएमच्या योजनांसाठी २३ कोटींचा समावेश आहे. माहे मार्चचे वेतन करण्यासाठी २५ कोटी रुपयांची मुदत ठेव मोडावी लागली आहे. चालू अंदाजपत्रकात शंभर कोटींची तूट आणि सुमारे ६५० कोटी रुपयांचा स्पीलओव्हर यामुळे महापालिकेचे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर करताना आयुक्तांनी हात आखडता घेतला आहे. प्रतिनिधी)एलबीटी अनुदानात कपातमहापालिकेने एलबीटीच्या माध्यमातून यंदा ८१० कोटींचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. त्यात ३० मार्चअखेर शासन अनुदानासह ८०२ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यात महापालिकेने ५० कोटी रुपयांच्यावरील उलाढालीतून ४३५ कोटी एलबीटी वसूल केला आहे. महापालिकेने त्यात सुमारे ४० कोटी रुपयांची अधिक वसुली केल्याने शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात जानेवारी २०१७ पासून कपात झालेली आहे. त्यात जानेवारीचे १० कोटी ९० लाख, फेब्रुवारी व मार्च महिन्याचे २४.८९ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टानुसारच अनुदान देण्याचे धोरण ठेवल्याने महापालिकेला त्यामुळे सुमारे ५० ते ६० कोटींचा फटका बसणार आहे. यंदा महापालिका जेमतेम आपले ८१० कोटींचे उद्दिष्टच गाठू शकेल. मागील वर्षी महापालिकेने उद्दिष्ट ७५१ कोटी रुपये निश्चित केले होते. प्रत्यक्षात ८३३ कोटी रुपये वसुली झाली होती.स्मार्ट सिटीचे अनुदान वर्गस्मार्ट सिटी अभियानासाठी केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा १३५ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेकडे वर्ग केले असून, सदर रक्कम स्मार्ट सिटी अभियानासाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यात आता महापालिकेला स्वत:चा हिस्सा ४५ कोटी रुपये टाकावे लागणार आहेत.उद्दिष्ट व प्राप्त महसूल कर प्रकार उद्दिष्टवसुलीस्थानिक संस्था कर ८१० कोटी८०२ कोटीघरपट्टी ११६ कोटी ८६.३७ कोटीविकास कर६० कोटी२५.१७ कोटीसंकीर्ण६१ कोटी९१.७३ कोटीपाणीपट्टी४०.२६ कोटी२८.४९ कोटी