Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:39 IST2026-01-03T14:38:44+5:302026-01-03T14:39:33+5:30

Nashik Municipal Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीत माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत सर्वच प्रभागात राजकीय ड्रामा दिसून आला.

Nashik Municipal Election 2026 last day high voltage drama politics in nashik | Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत

Nashik Municipal Election 2026 : धावपळ, उत्कंठा अन् रंगलेले माघारी नाट्य! अपक्षांच्या मनधरणीसाठी मोठी कसरत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीत माघार घेण्याच्या अंतिम मुदतीत सर्वच प्रभागात राजकीय ड्रामा दिसून आला. सिडकोत दोन इच्छुकांमध्ये झालेली हाणामारी आणि बडगुजर यांची माघार लक्षणीय ठरली. तर पूर्व प्रभागात माघार घेतल्यानंतर स्वपक्षाच्या आमदारावरच केलेले आरोप लक्षवेधी ठरले. पंचवटी प्रभागात माजी नगरसेवकाला माघारीसाठी पकडून आणल्यानंतरही अवघ्या काही मिनिटांच्या विलंबामुळे माधार होऊ शकली नाही. तर सातपूरमध्ये अपक्ष उमेदवारांची संभाव्य मोट शहरातील राजकारणात वेगळे उदाहरण ठरली.

सातपूरला भाजप-शिवसेनेचे बंडखोर रिंगणात

सातपूर - प्रभाग क्रमांक ८,९, १० आणि ११ या चार प्रभागांतून ७८ उमेदवारांनी माघार घेतली आहे. प्रभाग क्रमांक १० मधील भाजपचे बंडखोर माजी नगरसेवक शशिकांत जाधव, मनोज तांबे तर शिंदेसेनेचे बंडखोर रवींद्र देवरे आणि रोहिणी देवरे रिंगणात कायम असल्याने या प्रभागात चुरस निर्माण झाली आहे.

अपक्षांचे पॅनल तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तशी चर्चा सुरु झाली आहे. एकमत झाल्यास अपक्षांचे पॅनल तयार होऊ शकते आणि तसे झाल्यास राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसू शकतो.

प्रभाग १३, १४ व १५ मध्ये चुरशीची लढत

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३, १४ आणि १५ मध्ये राजकीय वातावरण तापले असून, सर्वच गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. माजी नगरसेवक, महापौरांचे नातेवाईक, माजी आमदारांचे वारसदार, तसेच पक्षबदल केलेले उमेदवार रिंगणात उतरल्याने या प्रभागांकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

या तीनही प्रभागांत पक्षीय ताकद, स्थानिक प्रभाव, नातेसंबंध आणि पक्षफुटी यांचा प्रभाव दिसून येत असून, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३, १४ आणि १५ मध्ये राजकीय वातावरण तापले असून, सर्वच गटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नव्हता. यापूर्वी लोकप्रतिनिधी असताना प्रभागात अनेक कामे केली आहेत. त्याच जोरावर मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असून, अपक्ष लढत देण्यावर ठाम आहे.

शशिकांत जाधव, भाजप बंडखोर

सातपूरला सर्वप्रथम पक्षवाढीसाठी काम केले. शासकीय योजना घराघरांमध्ये पोहोचविल्या, अन्य पक्षांतील नेत्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केलेत. पक्षनेत्यांनी धनदांडग्यांना उमेदवारी देऊन अन्याय केला आहे.

रवींद्र देवरे, शिंदेसेना बंडखोर

गेल्या पाच वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. खूप मेहनत घेतली. निष्ठेने पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेत. तरीही डावलण्यात आले. उमेदवारी करून परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करणार आहे.

मनोज तांबे, भाजप बंडखोर

पहिल्या प्रभागापासूनच निष्ठावंतांच्या बंडखोरीचे ग्रहण

नाशिक: पंचवटीतील प्रभाग एकमधील निष्ठावंत आणि पक्षाचे नाशिकचे सरचिटणीस अमित घुगे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार कायम राखत बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपला पहिल्या प्रभागापासूनच निष्ठावंतांच्या बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. गत वीस वर्षे भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करताना युवक मोर्चापासून शहर सरचिटणीसपदापर्यंत जबाबदारी निष्ठेने पार पाडली.

शहराध्यक्ष आणि या विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी माझा विश्वासघात केला आहे, असा थेट आरोपही घुर्गेनी केला असल्याने पंचवटीतील भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रभाग १ पासून बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. उमेदवारांच्या प्रचाराला आता वेग येणार आहे.

पूर्वच्या प्रभाग २३ मधून शाहीन मिर्झा, जगन पाटील यांची माघार

इंदिरानगर निवडणुकीच्या महापालिका पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६, २३ आणि ३० मधील उमेदवारांच्या उमेदवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या प्रभाग २३ च्या माजी नगरसेविका शाहीन मिर्झा आणि जगन पाटील यांनी अर्ज मागे घेतला. उमेदवारी माघारीच्या दोन दिवसांत या तीन प्रभागांमधून एकूण ४३ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.

पूर्वमधील तीन प्रभागांसाठीची प्रक्रिया श्री वल्लभनगरच्या दिव्यांग स्वाभिमान भवन येथे सुरळीतपणे पार पडली. प्रभाग क्रमांक २३ मध्ये माजी नगरसेविका सुरेखा पाटील आणि त्यांचे पती जगन पाटील यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती, मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज दोघांनीही आपली उमेदवारी मागे घेतली.

प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपच्या माजी नगरसेविका शाहीन मिर्झा यांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी आज आपली उमेदवारी माघारी घेतली आहे. महापालिका निवडणुकीतील राजकीय हालचालींना वेग देणारी ठरली असून, माघारीमुळे प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जगन पाटील यांनी माघार घेतल्यानंतर आपण पक्षाचे काम करीत असतानाही उमेदवारी देताना विश्वासात न घेता माघार घ्यायला लावल्याने अन्याय झाल्याचा आरोप केला.

Web Title : नासिक नगर निगम चुनाव: ड्रामा, नाम वापसी और बागी उम्मीदवार।

Web Summary : नासिक नगर निगम चुनावों में उम्मीदवारों की नाम वापसी के साथ ड्रामा हुआ। भाजपा और शिवसेना के बागी उम्मीदवार मैदान में बने रहे, जिससे स्वतंत्र पैनल बनने की संभावना है। अंदरूनी कलह और आरोपों ने कई वार्डों में नाम वापसी प्रक्रिया को चिह्नित किया, जिससे कड़ी प्रतिस्पर्धा का मंच तैयार हो गया।

Web Title : Nashik Municipal Elections: Drama, withdrawals, and rebel candidates emerge.

Web Summary : Nashik's municipal elections saw drama as candidates withdrew, some reluctantly. Rebel candidates from BJP and Shiv Sena stayed in the race, potentially forming an independent panel. Infighting and accusations marked the withdrawal process in several wards, setting the stage for intense competition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.