शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

नाशिककरांना लागली फ्री वाय-फायची चटक

By admin | Updated: October 17, 2014 00:06 IST

नाशिककरांना लागली फ्री वाय-फायची चटक

नाशिक, दि. १६ - हल्ली वाय-फाय हे अतिशय लोकप्रिय टेक्नॉलॉजी झाली असून, कार्पोरेट आॅफीसेस, हॉटेल्स, जीम, मोबाईल गॅलरी आदी हॉटस्पॉटवर ही सेवा हमखास सुरू असल्याचे बघावयास मिळते. कुठल्याही प्रकारचे मोबाईल रिचार्ज न करता वायरलेस पद्धतीने या सेवाचा लाभ घेता येत असल्याने नाशिककरांना या सेवेची चांगलीच चटक लागली आहे. कारण शहरातील बहुतेक वाय-फाय फ्री असलेल्या ठिकाणांवर तरुणांसह काही वरिष्ठ मंडळी तासन्तास मोबाईलवर विविध अ‍ॅप्स अथवा इतर डाटा डाऊनलोड करताना बघावयास मिळत आहेत. मात्र फ्री वाय-फाय सेवेवरही हॅकर्सचा डोळा असल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मोबाईल विक्रेत्यांना त्रासशहरातील बहुतांश कार्पोरेट आॅफीसेस, मोबाईल गॅलरी, हॉटेल्समध्ये फ्री वाय-फाय सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा फायदा घेताना कुठल्याही प्रकारचा पासवर्ड विचारला जात नसल्याने मोबाईलधारक फ्री सेवेस सहज कनेक्ट होतात. इंटरनेट फ्री मिळत असल्याने मोबाईलधारक तासन्तास एकाच ठिकाणी उभे राहून अ‍ॅप्स व इतर डाटा डाऊनलोड करण्याचा धडाकाच लावत आहेत. मोबाईल गॅलरीमध्ये तर फुकट वाय-फाय वापरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मोबाईल विक्रेत्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कॉलेज कुमारांचा क्लास गॅरलीबाहेरजवळपास सर्वच कॉलेज तरुणांकडे अ‍ॅड्राईड मोबाईल असल्याने या तरुणांमध्ये नवनवीन अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. इंटरनेटचे रिचार्ज करून अ‍ॅप्स डाऊनलोड करणे अशक्य होत असल्याने हे तरुण क्लास बंक करून फ्री वाय-फाय असलेल्या ठिकाणी आपला मोर्चा वळवितात. विशेषत: मोबाईल गॅलरींमध्ये तासन्तास ठिय्या देऊन ही मंडळी नवनवीन अ‍ॅप्स डाऊनलोड करीत असल्याने मोबाइल विक्रेत्यांना याचा त्रास सहन करावा लागत एव्हीजी अ‍ॅँटी व्हायरस करा डाऊनलोडफ्री वाय-फाय सेवा अधिक सुरक्षित असावी याकरीता एव्हीजी अँटी व्हायरस टूल डिव्हाइसमध्ये डाऊनलोड करूण घेणे अत्यावश्यक आहे. एव्हीजी अँटी व्हायरस टूल गॅझेटच्या सर्व अँप्लिकेशन्स स्कॅन करून वेळोवेळी युजरला इंफॉर्म करतो. अशा प्रकारे युजर आधीच सावध होतो आणि त्याचा गॅझेट मेलवेअरचा सावज होण्यापासून वाचतो. एवढेच नाही तर हा अँटी व्हायरस टूल एसएमएस मेलवेअरच्या धोक्यापासूनही वाचवतो. याशिवाय युजर पासवर्ड टाकून असे अँप्लिकेशन्स लॉकही करू शकतात. यामुळे त्यांचा डिव्हाइस हॅक होत नाही.पर्सनल डाटा हॅक होण्याची शक्यताआपल्यापैकी अनेकजण लॅपटॉप, टॅब्लेट किंवा स्मार्टफोनला फ्री पब्लिक वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट करतात, परंतु असे करणे घातक ठरू शकते. याच्या आधारे हॅकर्स तुमच्या वेबसाइट लॉग-इन द्वारे डिटेल मिळवू शकतात. तथापि, जेव्हा युजर अनसेफ वाय-फायशी कनेक्ट राहील तेव्हाच असे शक्य आहे. तसेच हॅकर्स एखाद्या अँप्लिकेशनला मेलवेअरचे सावज दाखवून स्मार्टफोन किंवा टॅब्लेटद्वारे पर्सनल इन्फॉर्मेशनही चोरी करू शकतात, परंतु हॅकर्सच्या भीतीने फ्री पब्लिक वाय-फायचा वापर बंद करावा, असा त्याचा अर्थ होत नाही. साविधगरी बाळगल्यानंतर कोणतीही समस्या न उद्भवता फ्री वाय-फायचा वापर केला जाऊ शकतो, असे तज्ञांकडून सांगण्यात आले. अ‍ॅप्स अपडेट करण्याचा धडाकास्मार्टफोन अथवा टॅब्लेटमध्ये अ‍ॅप्स अथवा एखादे फिचर अपडेट करण्याचा तरुणांकडून धडकाच लावला जात आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही एखादे अ‍ॅप्स डाऊनलोड केले असेल तर त्यात आजच्या तारखेत खूप बदल झालेले असतात. त्यामुळे अ‍ॅप्समध्ये सेक्युरिटी फीचर्स अपडेट करत राहावे लागते, जेणेकरून नवीन धोक्यांपासून वाचता येईल. तथापि, स्मार्टफोन आणि टॅब्लेट आपोआपही अपडेट होत असतात. उदाहरणार्थ आयफोन आणि आयपॅडमध्ये आयओएस-5 व्हर्जनचे सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. जेव्हा युजर चीप वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट होऊ लागतात तेव्हा हा सॉफ्टवेअर इंफॉर्म करतो. मात्र बहुतेक अँड्रॉइड बेस स्मार्टफोन आण टॅब्लेटमध्ये अशी सुविधा नसल्याने अ‍ॅप्स डाऊनलोड करण्याचा धडका लावला जात आहे.