घोटी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिक येथे आयोजित मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाला आगरी सेनेने पाठिंबा दिला आहे. सेनेच्या घोटी येथे झालेल्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला.इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी आदि प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीच्या लढ्याला पाठिंबा दर्शविण्यासाठी घोटी येथे समाजबांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. समृद्धी महामार्गामुळे अनेक गावे बाधित होणार असल्याने या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू, असे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह भालचंद्र साळवी, काशीनाथ मेंगाळ, शिवराम झोले, रतन इचम, गोरख बोडके, संदीप गुळवे यांनी दिला आहे. मेळाव्यास ज्ञानेश्वर लहाने, पांडुरंग वारुंगसे, दिनकर उघडे, संपत डावखर, विठ्ठल लंगडे, अनिल भोपे, सखाराम जोश, लालू दुभाषे, ज्ञानेश्वर भटाटे उपस्थित होते. (वार्ताहर)
घोटीत आगरी समाजाचा मेळावा
By admin | Updated: September 13, 2016 00:33 IST