चिकुनगुनिया, हिवताप व डेंग्यूची साथ सुरू झाली असून भगूर नगरपालिकेने डास निर्मूलनासाठी फवारणी सुरू केली आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती गोळा करून औषधे देऊन महिनाभरात साथ आटोक्यात आणणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी एस. एन. शेख यांनी दिली
पावसाळा सुरू होताच घाण डबके आणि घरासमोर
ठेवलेल्या सिमेंट टाक्या, प्लास्टिक पिंपे याचा उपसा न केल्यास डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते, त्यामुळे भगूर शहरात व परिसरातील आठवडी बाजार, सफाई कामगार वसाहत, चिंचबण, राममंदिर रोड, तेली गल्ली आदी परिसरात फवारणी करण्यात येत असून आरोग्य विभाग घरोघरी जाऊन कोरडा दिन पाळून आठवड्यातून एकदा पाणी
टाक्या पिंपे साफ करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोट :- परिसर अस्वच्छ ठेवत पाण्याचा साठा करीत
त्यावर पावसाळ्यात डास निर्मिती होते, दुर्लक्ष केल्यास विविध प्रकारचे आजार होतात. हे जीवघणे नसून त्रासदायक असतात भगूरमध्ये २००६ मध्येच चिकुनगुनियाची साथ आली होती. त्यानंतर आताच साथ
आली असून, नागरिकांनी मोफतच्या गोळ्या, औषधी घेतल्यास एक महिन्यात साथ नष्ट होईल, नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. - एस. एन. शेख, आरोग्य विभागप्रमुख, भगूर
फोटो :- भगूर न.पा. दवाखान्यात आजाराची तपासणी (फोटो १६ भगूर)