शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

सुरगाणा येथे मातंग समाज मेळावा

By admin | Updated: January 8, 2017 00:55 IST

ज्ञानेश्वर काळे : पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती सुरूच

सुरगाणा : तंत्रज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील मातंग समाजबांधवांना पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात वणवण फिरावे लागते, हेच या समाजाचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन मातंग समाज जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केले.सुरगाणा येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, तर प्रमुख अतिथी म्हणून महाबँकेचे सदाशिव पाटील, एस. सी. चव्हाण, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, नगराध्यक्ष रंजना लहरे, उपनगराध्यक्ष सचिन आहेर, नगरसेवक सुरेश गवळी, ज्ञानेश्वर कराटे, नगरसेवक शोभा पिंगळे, शेवंता वळवी, दिनकर पिंगळे, प्रकाश वळवी, शांताराम पगारे, मोहन रंजवे, सुरेश साबळे, तालुका अध्यक्ष निवृत्ती गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.काळे पुढे म्हणाले की, मागासवर्गीयांसाठी शासन विविध योजनांबाबत घोषणा करते; मात्र त्या तळागाळातील जनतेपर्यंत खरंच पोहचतात काय, हा प्रश्नच आहे. दरम्यान, महाबँकेचे सदाशिव पाटील यांनी गुरुकुल प्रशिक्षण, व बँकेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देऊन कर्जफेडीबाबतच्या काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, अशोक साळवे, शांताराम पगारे, चंद्रकांत आल्हाड यांनीही मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष रंजना लहरे यांनी मातंग समाजबांधवांची घरे त्यांच्या नावे करून देण्याबरोबरच गावाच्या संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर लाभार्थींना कर्ज प्रकरण फॉर्मचे वाटप करण्यात आले. यशवंत शिरसाठ यांनी स्त्री शिक्षणाची आस धरून मुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचे आवाहन केले व ग्रामीण भागात प्रथमच आयोजित केलेला मेळावा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)