यासाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून तसेच तिचे स्त्रीधन व संसारोपयोगी वस्तू ताब्यात घेऊन शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पतीसह सासू, सासरे व नणंद या चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. आठ वर्षांपूर्वी त्या पीडितेचा विकास रमेश गिते याच्याबरोबर विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी विकास गिते (पती), जयश्री गिते (सासू), रमेश गिते (सासरे) व स्नेहल विजय बडदे (नणंद) यांनी प्लॉट घेण्यासाठी तीस लाख रुपयांची मागणी केली त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पती विकासकडे तीस लाख रुपये रोख स्वरूपात दिले होते. मात्र तरी देखील त्यानंतर सासरकडच्या मंडळींनी आणखी तीस लाख रुपये आणावेत यासाठी तगादा लावला. त्यातून तुला व्यवस्थित घर का मिळत नाही तुझ्या घरच्यांनी तुला काही शिकवले नाही असे म्हणून वारंवार तिला उपाशी ठेवून शिवीगाळ मारहाण केली. तसेच लग्नात मानपान दिला नाही अशा विविध कारणांवरून साखरपुड्यावेळी दिलेले स्त्रीधन तसेच संसारोपयोगी वस्तू ताब्यात घेऊन मुलगा आयुष्य यास ताब्यात ठेवून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक सुनील कार्लेस तपास करीत आहेत.