शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
3
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
4
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
5
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
6
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
7
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
8
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
9
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
10
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
11
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
12
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
13
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
14
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
15
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
16
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
17
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
18
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
19
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
20
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

जनराज्य आघाडीचे भाजपात विलीनीकरण

By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST

जनराज्य आघाडीचे भाजपात विलीनीकरण

नवा पेच : नगरसेवक रिजवान खान मात्र अलिप्तमालेगाव : येथील जनराज्य आघाडीचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले असले तरी मालेगाव महानगरपालिकेतील आघाडीचे एकमेव नगरसेवक प्रा. रिजवान खान यांनी मात्र स्वत:स या कार्यक्रमापासून दूर राखले आहे. तथापि, मनपात आपण जनराज्य आघाडीचे नगरसेवक म्हणूनच कार्यरत राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुुख उपस्थितीत आज येथील मसगा महाविद्यालयात जनराज्य आघाडीचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य यांचा रितसर भाजपा प्रवेश झाला. मात्र मालेगाव महानगरपालिकेतील जनराज्य आघाडीच्या तिकीटावर निवडून आलेले एकमेव नगरसेवक प्रा. रिजवान खान मात्र या कार्यक्रमास अनुपस्थित होते. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण भाजपात प्रवेश केला नसल्याचे सांगितले. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात आपली जनराज्य आघाडीचे नगरसेवक, मनपा गटनेते म्हणून नोंद आहे. नुकतीच मनपा स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीवरही जनराज्य आघाडीचा नगरसेवक म्हणून निवड व नोंद झालेली आहे. भविष्यातही ती तशीच राहिल असा दावा खान यांनी केला आहे. एखाद्या पक्षाचे दुसऱ्या पक्षात विलीनीकरण झाल्यानंतर त्या पक्षाचा निर्वाचित सदस्य जुन्या पक्षाचा सदस्य म्हणून राहू शकतो का ? त्याची इतर पदांवरील निवड वैध राहू शकते का? आधीचे पक्षाध्यक्ष संबंधित सदस्याविरुध्द काय भूमिका घेवू शकतात असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. (प्रतिनिधी) आघार बुद्रुकला चोरीचा प्रयत्नमालेगाव : तालुक्यातील आघार बुद्रुक गावी घरात एकटी असलेल्या अपंग महिलेकडून कपाटाची चाबी मांगून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अनोळखी इसमाविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप आनंदा वाघ (५६) यांनी फिर्याद दिली. (वार्ताहर)अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.