शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोखंडी पूल धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:05 IST

तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

नाशिक : तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.  प्रभू रामचंद्र वनवास काळात शहरातील तपोवनात काही काळ वास्तव्यास होते. या परिसराला धार्मिक पौराणिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने देशभरातील पर्यटकांची या ठिकाणी कायम वर्दळ असते. पूल ओलांडून टेकडीवर असलेल्या राम, सीता, लक्ष्मण यांच्या प्रतिमेच्या भव्य प्रतिकृतींसोबत सेल्फी काढण्यासासाठी पर्यटक जात असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या प्रतिकृतींजवळ पोहचण्यासाठी हा लोखंडी पुलाचा एकमेव मार्ग आहे. सध्या नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून, मागील महिन्यात आलेल्या पुरामुळे या पुलाची दुरवस्था होऊन पुलाचा मार्ग धोकादायक बनला आहे. पुलावर टाकलेले लाकडी बांबूही पाण्याने भिजून कमकुवत झाले आहेत. तर काही लाकडी फळ्या तुटल्या आहेत. याबरोबरच लोखंडी पुलाला असलेल्या साखळ्यांचे संरक्षण ही तुटले आहे. एकूणच या पुलावरून मार्गस्थ होताना कुठलाही आधार राहिलेला नाही. केवळ तोल सांभाळत धाडस करून तरुण ये-जा करताना दिसत आहे. मात्र अनवधानाने लक्ष विचलित होऊन किंवा पाय घसरून तोल गेल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी बॅरिकेड लावावे; पर्यटकांनी दक्षता घ्यावीशहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असून, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रविवारी दिवसभर तसेच सोमवारी पहाटेपर्यंत पाऊस जोरात सुरू असल्यामुळे धरणातून विसर्गही वाढविला गेला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २३ मि.मी. इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला. सध्या धरणातून ३१२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, होळकर पुलापासून पुढे तपोवनापर्यंत साडेचार हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी प्रवाहित आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत हा पूल बंद ठेवण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी पुलाच्या प्रारंभी बॅरिकेड लावण्याची गरज आहे. पावसाळ्यानंतर महापालिकेने सदर पुलाची पुन्हा दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.