जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द आरोग्य उपकेंद्रची इमारत जीर्ण होऊन पडल्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या मागील दोन, तीन वर्षांपासून कामकाजात व्यत्यय येत होता, प्रसूती कक्ष बंद असल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांची गैरसोय होत होती. सार्वजनिक इमारतीत ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगातून विस्तारीकरण करून सुसज्ज व्यवस्था करून प्रसूती कक्ष शुक्रवार (दि.२) पासून सुरू करण्यात आला.या तात्पुरत्या इमारतीत प्रसूती कक्ष तसेच लसीकरण व आरोग्य यंत्रणेचे सर्व गावचे कामकाज याच इमारतीतून सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत चिचोंडी खुर्द कडून मागील वर्षी स्टेथोस्कोप, बीपी आॅपरेटर, वजन काटा, टेबल, खुर्च्या, कपाट तसेच संपूर्ण औषधे व गोळ्या मागील कालावधीत देऊन कोरोना प्रतिबंध करिता इन्फ्रारेड थर्मा मीटर, आॅक्सिमिटर, सॅनिटायझर, हॅण्डग्लोज, कोरोना प्रतिबंधात्मक आवश्यक इतर साहित्य देऊन गावाच्या आरोग्य अबाधित ठेवण्याचे काम केले आहे.आज येथील उपकेंद्राचे सुरळीत कामकाज सुरू झाले आहे. या कामकाजाकरिता येथील डॉ. एल. व्ही. चव्हाण, डा. विठ्ठल पैठणकर, डॉ. गोविंद मढवई, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, कामकाज बघतात. उद्घाटन प्रसंगी पूजन येथील ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सिंधुबाई मढवई यांच्या हस्ते, श्यामराव मढवई यांनी श्रीफळ वाढवून तर उदघाटन माजी सरपंच रवींद्र मढवई व उपसरपंच साईनाथ मढवई यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी ग्रामसेवक बी. बी. गायके, संतोष मढवई, सुरेश मढवई, प्रमोद देवडे, रावसाहेब मढवई, सचिन मढवई, प्रशांत मढवई आशा कार्यकर्ती, तसेंच संपूर्ण आरोग्य विभागातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.चिचोंडी खुर्द आरोग्य उपकेंद्रांचे कामकाज उत्तम असून तालुक्यातील सर्वाधिक प्रसूतीमध्ये देखील प्रथम क्र मांक मिळविलेल्या उपकेंद्रांची इमारती अभावी मागील काही वर्षांपासून गैरसोय झाली होती. नवीन इमारतीसाठी आम्ही प्रस्ताव दाखल केला असून लवकर पाठपुरावा करून नवीन इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.-मनिषा मढवई, सरपंच, चिचोंडी खुर्द.
चिचोंडी खुर्द येथे सार्वजनिक आरोग्य उपकेंद्रांचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 18:42 IST
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील चिचोंडी खुर्द आरोग्य उपकेंद्रची इमारत जीर्ण होऊन पडल्यामुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या मागील दोन, तीन वर्षांपासून कामकाजात व्यत्यय येत होता, प्रसूती कक्ष बंद असल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांची गैरसोय होत होती. सार्वजनिक इमारतीत ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगातून विस्तारीकरण करून सुसज्ज व्यवस्था करून प्रसूती कक्ष शुक्रवार (दि.२) पासून सुरू करण्यात आला.
चिचोंडी खुर्द येथे सार्वजनिक आरोग्य उपकेंद्रांचे उदघाटन
ठळक मुद्देलसीकरण व आरोग्य यंत्रणेचे सर्व गावचे कामकाज याच इमारतीतून सुरू करण्यात आले.