नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक येथे काश्मीरमधील कुपवाडा मराठा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रणय पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सीमारक्षणात झालेले अनेक आमूलाग्र बदल, दूरवरील गावांपर्यंत पोहोचलेली वीज, पाणी, रस्ते इत्यादींची कर्नल पवार यांनी माहिती दिली. सामान्य माणसाच्या मनात कुतूहल असलेले प्रश्न यानिमित्ताने त्यांना विचारता आले. काश्मीरमधील कुपवाडासारख्या दुर्गम प्रदेशात तेथील गावकऱ्यांच्या मानसिकतेवरही मोठ्या प्रमाणावर भारतीय सेना दल काम करत आहे. त्यासाठी भारतीय सेना दलाला भारतीय जनतेचा पाठिंबा आवश्यक असून त्यासाठी भारतीयांनी, डॉक्टरांनी पुढे यावे असे कर्नल पवार यांनी सांगितले. जाज्वल्य देशप्रेम आणि कामाप्रति निष्ठेची ज्योत तेवत ठेवत कार्यक्रम पार पडला. यावेळी नाशिक अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे ,सचिव डॉ.सुदर्शन आहिरे, उपाध्यक्ष डॉ. प्राजक्ता लेले, कोषाध्यक्ष डॉ.प्रशांत सोनवणे, डॉ. राजेंद्र कुलकर्णी, वुमन विंग चेअरमन डॉ. निकिता पाटील ,डॉ. स्वाती वंजारी तसेच डॉ. भाऊसाहेब बच्छाव, डॉ. मुक्तेश दौंड, डॉ.निनाद चोपडे, डॉ. प्रीतम अहिरराव सर्व कार्यकारिणी मंडळ तसेच डॉ. ऋषिकेश परमार, डॉ. सुनील जगताप यांच्यासह अनेक प्रतिथयश डॉक्टर उपस्थित होते.
इन्फो
नाशिकचे डाॅक्टर्स देणार काश्मिरात सेवा
देशसेवेसाठी सदैव तत्पर सैनिकांचा महामारीच्या काळात कोरोनानामक शत्रूशी युद्ध करणाऱ्या आरोग्य सैनिकाशी संवाद साधण्याचा योग त्यानिमित्ताने आल्याने खूप आनंद झाल्याचे डॉ. चंद्रात्रे यांनी सांगितले. कर्नल पवार यांनी व्यक्त केलेल्या भावनेस अनुसरुन काश्मीरमधील दुर्गम भागात नाशिकचे काही डॉक्टर्स यंदाच्या वर्षभरात सेवा देण्यास जरूर येतील, अशी ग्वाही डॉ समीर चंद्रात्रे यांनी दिली.
फोटो
२७आयएमए फोटो