इगतपुरी : फेसबुकच्या माध्यमातुन महामानवाच्या प्रतिमाची विटबंना करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी इगतपुरीतील बौद्ध बांधव व सम्यक बहुउद्देशीय संघ यांच्या वतीने बौद्ध विहार ते पोलीस ठाणे पर्यंत मोर्चा काढण्यात आला व इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना निवेदन देण्यात आले.विटबंना करून अवमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी याच्या निषेध म्हणून सोमवार ९ जून रोजी इगतपुरी शहर बंद करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्याकडे तक्रार नोंदवली. यावेळी मोर्चात संजय थोरात चंद्रकांत उबाळे, माजी नगरसेवक मिलिंद हिरे, संतोष चिकणे, शंकरराव डांगळे, अनिल सोनवणे, आकाश साळवे, किरण जगताप, पंकज बर्वे, अविनाश पगारे, राहुल दोंदे, अमोल मोरे, संजय नेटावटे, प्रमोद उबाळे, पंडित दिवे, नारायण जाधव, एस. पी. नेटावटे, मनोज मोरे, किरण झाल्टे, सुरेश गांगुर्डे, शोभा झाल्टे, संगीता पराड, रेखा शिंदे, कल्पना झाल्टे, विद्या थोरात, सुरेखा पराड, लावण्या झाल्टे, कविता पराड, मंदा पराड आदि शेकडो महिला सहभागी झाले होते.
सम्यक संघातर्फे इगतपुरीत मोर्चा
By admin | Updated: June 9, 2014 00:31 IST