शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

हैदराबादचा संजय कैरा ‘मविप्र मॅरेथॉन’ विजेता

By admin | Updated: January 9, 2017 01:21 IST

महिला गटात अर्चना कोहकडे विजेती : महिलांच्या गटात अहमदनगरच्या स्पर्धकांचे वर्चस्व

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे चौथ्या राष्ट्रीय, नवव्या राज्यस्तरीय आणि १८व्या ‘नाशिक मविप्र मॅरेथॉन’चा किताब हैदराबाद येथील स्पर्धक संजय कैरा याने पटकावला. रविवारी (दि. ८) गंगापूररोड मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिटपटू अंजू बॉबी जॉर्ज यांच्या हस्ते करण्यात आले.गोळकंडा हैदराबाद येथील संजय कैरा यांनी २:२७:२७ सेकंद या वेळेत निर्धारित ४२.१९५ किमीचे अंतर पूर्ण करून स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले. यावेळी संजय कैरा यांना अंजू बॉबी जॉर्ज यांच्या हस्ते एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी नाशिकसह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, सांगली, कराड, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, रत्नागिरी, अमरावती, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, धुळे, कर्नाटक यांसह सेनादल आणि रेल्वेतील विविध स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.मविप्र मॅरेथॉन चौकापासून सुरुवात झालेल्या स्पर्धेचा जुना गंगापूर नाका, डॉ. विद्या विकास सर्कल, आनंदवली, सोमेश्वर, हॉटेल गंमत- जंमत, दुगाव फाटा, गिरणारे, धोंडेगाव, गंगापूर रोड मार्गे पुन्हा मॅरेथॉन चौक येथे समारोप करण्यात आला. मॅरेथॉन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी अंजू बॉबी जॉर्ज यांनी मॅरेथॉन हा सहनशीलतेचा खेळ असून यामध्ये मनावरचे नियंत्रण आणि शरीराचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच अधिकाधिक युवा खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करण्याचेही आवाहन यावेळी केले.