इगतपुरी : कला व वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२) इगतपुरी शहरात हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी रैली काढण्यात आली. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात हेल्मेट घालणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते त्यांना हेल्मेट वापरण्याची व स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती स्वयंसेवकांनी केली. नाशिक जिल्ह्यात १ फेब्रुवारी पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. रस्ता दुर्घटनेत दुचाकीस्वारांना अपघातात हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून प्राण गमवावा लागतो. दुचाकीस्वारांनी स्वत:च्या प्राणाच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरणे गरज आहे. तरीही बºयाच वेळा याकडे दुर्लक्ष केले जाते. हेल्मेट वापराविषयी जनजागृती व्हावी व रस्ता दुर्घटनेत नाहक बळी जाणाºयांचे प्रमाण कमी व्हावे हाच उद्देश या रॅलीचा होता. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन वामन, राष्टÑीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी प्रा. गोपाळ लायरे, प्रा. डॉ. सुप्रिया कूलथे, प्रा. स्वाती हनुमंते, प्रा. शशिकांत सांगळे तसेच प्राद्यापक वर्ग व स्वयंसेवक उपस्थित होते. रॅलीचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते. (फोटो ०२ हेल्मेट)
इगतपुरी शहरात हेल्मेट जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 18:53 IST
इगतपुरी : कला व वाणिज्य महाविद्यालय, इगतपुरी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.२) इगतपुरी शहरात हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी रैली काढण्यात आली. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात हेल्मेट घालणाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
इगतपुरी शहरात हेल्मेट जनजागृती रॅली
ठळक मुद्देस्वत:च्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती स्वयंसेवकांनी केली.