शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: राधाकृष्ण विखे-पाटील आझाद मैदानात; मनोज जरांगे यांची घेतली भेट, मसुद्यावर चर्चा सुरू
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
5
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
6
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
7
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
8
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
9
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
10
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
11
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
12
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
13
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
14
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
15
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
16
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
17
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
18
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
19
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
20
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा

नवीन वर्षात सुखावह प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

नाशिक महापालिकेच्या बससेवेला अखेरीस नव्या वर्षात प्रारंभ हाेणार असून, २६ जानेवारीपासून पन्नास बसेस रस्त्यावर येणार आहेत. आयटीएमएस म्हणजेच इंटिलेजंट ...

नाशिक महापालिकेच्या बससेवेला अखेरीस नव्या वर्षात प्रारंभ हाेणार असून, २६ जानेवारीपासून पन्नास बसेस रस्त्यावर येणार आहेत. आयटीएमएस म्हणजेच इंटिलेजंट ट्राफिक मॅनेजमेंटसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन तिकीट काढणे किंवा बुकिंगसह असलेली ही पहिल्याच प्रकाराची सोय असणार असल्याने या सेवेविषयी उत्कंठा आहे.

- दोनशे सीएनजी तर पन्नास मिनी डिझेल बस सुरूवातीला असतील. पाच टप्प्यांत ही सेवा असणार आहे. सुरुवातीला नऊ मार्गांवरून ही सेवा सुरू होईल.

- दीडशे इलेक्ट्रिकल बस सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, केंद्र शासनाने पन्नास बससाठीच अनुदान देण्याचे धोरण ठरवल्याने तूर्तास हा विषय प्रतीक्षेत आहे.

---------

एचएएलला नाईट पार्किंग

नाशिकसाठी ओझर विमानतळावरून हवाई सेवा सुरू झाल्यानंतर आता या ठिकाणी आता नाईट पार्किंगला परवानगी मिळाली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हा विषय प्रतीक्षेत होता.

राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर एचएएल व्यवस्थापनाकडे हा विषय गेला हाेता. त्यास यंदा मंजुरी मिळाली. सुरुवातीला या ठिकाणी सहा विमानाने रात्री राहू शकतील. या सेवेमुळे नाशिकमध्ये अशी विमाने प्रवासी घेऊन येतील आणि नंतर सकाळी ते प्रवासी ही नेणार असल्याने अनेक शहर, राज्य आणि आंतरराष्ट्रीय शहरांशी नाशिक जोडले जाऊ शकेल.

-----------

शहरात अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते

- नाशिक शहरात अडीचशे कोटी रुपयांचे रस्ते करण्यात येणार असून, बहुतांश रस्ते हे नाशिक शहरातील कॉलनी आणि ग्रामीण भागात असणार आहेत. त्यामुळे मोठी गैरसोय दूर हेाणार आहे.

- नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात १२ नवीन पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू होणार असून, त्यामुळे २४ डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेने मुंबईच्या सीपीएसशी सलग्न शिक्षणक्रम असतील. त्यामुळे महापालिकेला मनुष्यबळाची मदत होत आहे.

- शहरातील वाहनतळाची कोंडी फोडण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट पार्किंग नवीन वर्षात सुरू होणार आहे. २८ ऑन स्ट्रीट आणि पाच ठिकाणी ऑफ स्ट्रीट स्वरूपाची ही पार्किंग असेल. नागरिकांना ॲपवरून वाहनतळाची जागा आरक्षित करता येणार आहे.

- शहरातील प्रलंबित सीसीटीव्ही बसविण्याच्या कामांना नव्या वर्षात प्रारंभ होणार आहे.

शहरातील ४६ चौक म्हणजेच ज्या ठिकाणी सिग्नल्स आहेत, तेथे सर्व प्रथम सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. त्यानंतर, शहरातील अन्य भागात आणि महत्त्वाच्या मार्गावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे.

------

नाशिक शहरात सीएनजीचे इंधन--

केंद्र शासनाच्या धोरणानुसार आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस एजन्सी ही शासन अंगीकृत संस्था सीएनजी गॅस आणत असून, त्यामुळे वाहनांसाठी पर्यावरण स्नेही इंधन उपलब्ध हाेणार आहे. शहरात दोन ठिकाणी सीएनजी पंप सुरू झाले असले, तरी द्रव रूप गॅस भरून आणावा लागतो. पालघर येथून नाशिक शहरातील विल्होळी येथे गॅस वाहनासाठी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे थेट नाशिकला गॅस येईल. विशेष म्हणजे गॅस केवळ वाहनांसाठीच नाही, तर घरगुती गॅससाठीही त्याचा वापर होऊ शकेल. त्यासाठी मेाठ्या गृहनिर्माण संस्थांमध्ये नोंदणीही सुरू झाली आहे.

----