शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदात्यांना सलाम कृतज्ञतेचा !

By admin | Updated: November 3, 2014 00:10 IST

वर्धापनदिन : थॅलेसेमिया केअर सेंटरच्या वतीने रक्तमित्र व रक्तसंघटक पुरस्कारांचे वितरण

नाशिक : रक्ताविना परंतु रक्तानेच जोडल्या गेलेल्या नात्याची वीण अधिक घट्ट व्हावी यासाठी अर्पण थॅलेसेमिया सोसायटी आणि आयएमए अर्पण थॅलेसेमिया केअर सेंटरच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तमित्र व रक्तसंघटक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या पालकांसह संस्थेच्या वतीने रक्तदात्यांना कृतज्ञतेचा सलाम करण्यात आला.शालिमार येथील आयएमए सभागृहात आयोजित कार्यक्रमांतर्गत पाच रक्तदात्यांना रक्तमित्र व जे रक्तदान शिबिरांचे नित्यनेमाने आयोजन करून केअर सेंटर आणि सोसायटीला मोलाचे सहकार्य करतात अशा काही रक्तसंघटकांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण अहेर, थॅलेसेमिया केअर सेंटरचे अध्यक्ष नरेंद्र शहा, क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीचे अतिरिक्त सहायक व्यवस्थापक अलोक खरे, कांतीलाल चोपडा, अतुल जैन, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर तातेड आदि उपस्थित होते. आई-वडील जर मायनर थॅलेसेमिया वाहक असतील, तर त्यांचे जन्माला येणारे मूल थॅलेसेमिया आजाराने पीडित जन्माला येऊ शकते. थॅलेसेमियाग्रस्त बाळाला दर महिन्याला रक्तसंक्रमण करावे लागते. या बालकांच्या शरीरात रक्तनिर्मितीची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन हे रक्तदात्यांच्या रक्तावरच अवलंबून असते. रक्तसंक्रमण सातत्याने करावे लागत असल्यामुळे अशा बालकांना रक्तावाटे पसरणाऱ्या आजारांची भीतीही अधिक असते. त्यामुळे एलाईजा व नॅट अशा दोन्ही तपासण्या झालेल्या रक्ताच्या पिशव्या आयएमए अर्पण थॅलेसेमिया केअर सेंटरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. अद्याप केंद्राच्या वतीने सुमारे चार हजार रक्तपिशव्यांचे मोफत संक्रमण करण्यात आले असून, सध्या केअर सेंटरमध्ये १९४ थॅलेसेमियापीडित मोफत उपचार घेत असल्याची माहिती डॉ. राजेश कुचेरिया यांनी दिली. प्रारंभी जी. टी. डान्स अकादमीच्या युवा कलावंतांनी ‘ये आशाएॅँ...’ ही लघुनाटिका सादर के ली. (प्रतिनिधी)