मालेगाव : तालुक्यातील वडनेर येथे ग्रामसेवकाअभावी गारपीटग्रस्त शेतकरी व पीडितांचे पंचनामे होत नसल्याने या गावात त्वरित ग्रामसेवकाची नियुक्ती करावी व नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे महसूल प्रशासानाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे वडनेर गावात त्वरित ग्रामसेवक नियुक्त करावा व नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच सौ. गायत्री वेताळ यांच्यासह शोभा चौधरी, सुनील चौधरी, भगवान वैद्य, राजेंद्र बागडे, सुनील शेवाळे, रतन सोनवणे, मुस्ताक शेख आदिंनी केली आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}