शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शेतकऱ्यांनो द्राक्ष, कांदा, भाजीपाला जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:51 IST

नाशिक : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ५८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड झाालेली आहे. ढगाळ वातावरणाचा गहू, हरभऱ्यापेक्षाही द्राक्ष, नवीन लागण झालेला कांदा, कांदा रोप आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या पिकांवर डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहवामानाचा फटका : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

सध्या द्राक्ष पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी द्राक्षामध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि बेमोसमी पावसामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असून, वातावरण निवळल्यानंतर मण्यांना क्रॅक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली असून कांद्याच्या उगवणक्षमतेवरही वातावरणाचा परिनाम होऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप पातळ पडले आहे. काही ठिकाणी रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच प्रकारच्या भाजीपाला आणि फळ पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवू लागला आहे. अशा वातावरणात भाजीपाला पीक लवकर रोगांना बळी पडत असल्याने शेतकऱ्यांनी विविध कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पीकनिहाय रब्बीचे क्षेत्र (हेक्टर)गहू - २८,६५५हरभरा - १९,६८९ज्वारी - २,१७५कांदा - ७८,४७९.४५द्राक्षाला सर्वाधिक फटकामागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही भागात तर सूर्यदर्शनच झालेले नाही. यात मागील दोन दिवसात जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, कांदा, गहू आणि भाजीपाला ही पिके धोक्यात आली आहेत. सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पदकांना बसला असून, शेतकऱ्यांना दररोज वेगवेगळी कीटकनाशक आणि पोषकांची फवारणी करावी लागत आहे.प्रमाणित कीटकनाशकांची फवारणी कराढगाळ वातावरणापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित कीटकनाशकांची वेळच्या वेळी फवारणी करावी. द्राक्षबागांमधील तपमान स्थिर रहाण्यासाठी उपाययोजना कराव्यात भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळीच औषध फवारणी करावी.ढगाळ वातावरणाचा द्राक्ष, कांदा, भाजीपाला, कांदा रोप, नवीन लागवड केलेला कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती