यावर्षी खरीप हंगामात परतीच्या अवकाळी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तसेच पोळ कांदा व कांदा रोप सडून खराब झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. केलेला खर्चही वसूल न झाल्याने खरिपाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी वर्गाने महागडे कांदा बियाणे उपलब्ध करीत कांदा रोप तयार केले व मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा तसेच उन्हाळ कांद्याची लागवड केली. गहू हरभरा पिकाची पेरणी केली. पिकेही चांगली आहेत; मात्र पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी वर्गाने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. आजमितीस पिकांना पाणी देणे गरजेचे आहे; परंतु दिवसभर वारंवार खंडित होणारा अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे जागरण करीत पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीजपंप जळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 17:50 IST
पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून व रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस
ठळक मुद्देजीव धोक्यात : खंडित, अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा परिणाम