शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

संकटाचा सामना : हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड यशस्वी

By admin | Updated: April 11, 2015 00:38 IST

शंभर दिवसात एक लाखाचे उत्पन्न

खामखेडा : दोन वर्षापासून कधी गारपिटीने तर कधी अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांनी खामखेडासह परिसराला चांगलाच फटका बसला आहे. तरी या संकटांवर मात करून खामखेडा येथील शेतकरी अशोक अहिरे यांनी हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. बेभरवश्याच्या काकडी पिकातून अवघ्या शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेत नैसर्गिक संकटापुढे हार न मानता चांगले उत्पन्न घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाचा लहरीपणा अलीकडे वाढला आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत आपले कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट नियोजन करणारे शेतकरी असतात. खामखेडा येथील अशोक अहिरे यांनी आपल्या वीस गुंठे हरितगृहात काकडीचे पीक यशस्वी घेत शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेतले आहे. वीस गुंठ्यात काकडीची लागवडयावर्षी वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड करण्याचे ठरवले. पाच फुटाच्या अंतरावर चाळीस मीटर लांबीच्या अठ्ठावीस बेड तयार केले. पुणे येथून नेदर्लंड सीड्स कंपनीच्या नऊ रु पये किमतीचे बियाणे घरी तयार करत पंचवीस जानेवारीला या बेडवर दोन बाय दीड फुटावर रोपांची लागवड केली. काकडी पंधरा फुटापर्यंत वाढत असल्याने या वनस्पतीचा वेल त्यांनी हरितगृहवरील लावलेल्या अ‍ॅँगलला प्लॅस्टिक दोराच्या साहाय्याने चढवली. काकडीची वेलीची रोजच वाढ होत असल्याने त्यांनी काळजी घेतली. पिकाची चौदा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. ठिबक सिंचनातून पाणी व विद्राव्य खते दिली जातात. त्यामुळे झाडाची वाढ होण्यासाठी, चांगली फळधारणा होण्यासाठी शेणखताबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये दिलीत. लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांत पीक निघण्यास सुरवात होते. (वार्ताहर)काकडीवर येणारे रोग, कीड, डावन्या, भुऱ्या, पांढरी माशी इत्यादी रोगांना बळी पडते; मात्र योग्य वेळी निरीक्षणातून लक्षणे दिसू लागताच फवारणी केल्यास लवकर रोग आटोक्यात येतात. याव्यतिरिक्त या पिकावर फवारणीची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर पिकांच्या तुलनेत काकडीला कीडनाशके व खते कमी लागतात. उत्पादन सुरू झाल्यानंतर जास्तीस जास्त दोन महिने या पिकापासून उत्पादन निघते. अहिरे यांनी पंचावन्न दिवसांत दहा तोडे घेतले असून, एका तोड्यास सुमारे दीड टन अशी वीस गुंठ्यात त्यांना पंधरा टन काकडीचे उत्पादन मिळाले आहे. या पिकामध्ये फळांची तोडणी करणे खूप चिवट काम आहे. पंधरा फुटापर्यंत उंच वाढलेल्या वेलीवरून एकेक फळ काढताना सतत वरच्या दिशेला पाहून शिडी अथवा स्टूलच्या साहाय्याने तोडणी करावी लागते. त्यामुळे ह्या कामासाठी आठ मजूर कायमस्वरूपी लागत असल्याचे असल्याचे अहिरे यांचे चिरंजीव रवींद्र यांनी सांगितले. काकडीस पहिल्यांदा पस्तीस ते चाळीस रु पये बाजारभाव मिळाला आणि दोन महिन्यात सरासरी तीस रुपयांपर्यंत बाजार मिळाला. प्लॅस्टिक पाऊचमध्ये भरणा करत संपूर्ण माल त्यांनी व्यापाऱ्यामार्फत मुंबई येथेच विक्री केला. लागवडीपासून काढणीपर्यंत अहिरे यांना एक लाख रु पये खर्च आला तर खर्च वजा जाता अवघ्या वीस गुंठ्यात शंभर दिवसाच्या पिकातून चार ते साढेचार लाखाचे उत्पादन काढले आहे.