शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

By admin | Updated: January 14, 2016 22:50 IST

येवला : साठवण तलावात केवळ ३० दलघफू पाणी; शहराला यापुढे पाच दिवसाआड पाणीपुरवठा

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ ३० दलघफू पाणी आले. सध्या पालखेडचे पाणी मनमाड शहर व रेल्वेसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा तलावाकडे वळविण्यात आले आहे. ५० दलघफू क्षमता असलेल्या येवला शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान ४५ दलघफू पाणी भरले जावे, अशी अपेक्षा होती व तसे पालिकेचे नियोजनही होते. तरच पाच दिवसाआड पाणी देऊन एप्रिल-अखेरपर्यंत येवलेकरांची तहान भागली जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात पुन्हा येवल्याला पाणी मिळणार असल्याची भाबडी अशा पालिका बाळगून असली तरी, आता पाणी मिळणार नसल्याची माहिती आहे.शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आवर्तनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत किमान ४५ दलघफू पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. कदाचित केवळ ३२ दलघफू पाणीसाठ्यावर समाधान मानले तर मार्चअखेरच अवघ्या तीन महिन्यांनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे स्पष्ट संकेत आजच स्पष्ट झाले आहेत. हतबल झालेल्या पालखेड प्रशासनाला येवला पालिका प्रशासनाने स्वत: अधिक लक्ष घालून मदत केल्याने किमान ३० दलघफू पाणीसाठा तरी उपलब्ध झाला. कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनधिकृत उपसा, पालखेड कालव्याचे प्रशासन, पोलीस या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे येवल्याला तब्बल चार दिवस उशिरा पाणी पोहोचले. नवीन साठवण तलावालगत ५०० मीटरपर्यंत १०९ विहिरी कागदावर असल्या तरी पुन्हा सर्वेक्षण करून नेमक्या विहिरी किती याची आकडेवारी निश्चित करून त्यांच्या होणाऱ्या अमर्याद उपशाबाबत कायदेशीर कृतियुक्त बंधने आणावी लागतील. तलावालगतच्या खासगी विहिरीतून पाणी विकले जाते यावरदेखील टाच आणावी लागेल. पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला व दरडोई १०० लिटर पाणी दिले तरी महिन्याला पाच दलघफू पाणी खर्ची पडते. या आकडेवारीवरून सध्या साठवण तलावात भरलेले ३० दलघफू पाणी सहा महिने पुरायला हवे; परंतु चार महिनेदेखील पुरत नाही.(वार्ताहर)