प्राचार्य रसाळ यांनी मनोगतात तपनीकरांचे कार्याचे पैलू उलगडले. त्यात त्यांनी सुरू केलेली केरळमधील ग्रंथालय चळवळ, तसेच केरळमधील साक्षरतेला चालना देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण बाबींची नोंद केली होती असे सांगितले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडून ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेतून मिळालेल्या १०० ग्रंथांची ग्रंथपेटीबद्दल उपस्थित प्राध्यापकांना माहिती दिली. डॉ. डी. एल. फलके यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय लिपिक सुधीर विधाते यांनी आभार मानले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एम. जाधव, डॉ. एस. एन. पगार, बी. यू. पवार, सी. जी. बर्वे, जी. पी. चिने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयीन सेवक विलास चव्हाण, मयूर बाजारे, उत्तम चव्हाणके, केदारनाथ मवाळ, रामदास डावरे, अरविंद घोलप, संजय बोराडे यांनी परिश्रम घेतले.
सिन्नर महाविद्यालयात वाचन दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST