शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

समको बँकेच्या दोन अपात्र संचालकांवर निवडणूक बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 22:28 IST

सटाणा : शहरातील मर्चंट को-ऑप. बँकेचे माजी चेअरमन व संचालक राजेंद्र बाळकृष्ण अलई व यशवंत निंबा अमृतकार या अपात्र संचालकांना आता आगामी निवडणुका लढण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे सत्ताधारी गटाला चांगलाच धक्का बसला आहे.

ठळक मुद्देजिल्हा उपनिबंधक खरे यांचा निर्णय

सटाणा : शहरातील मर्चंट को-ऑप. बँकेचे माजी चेअरमन व संचालक राजेंद्र बाळकृष्ण अलई व यशवंत निंबा अमृतकार या अपात्र संचालकांना आता आगामी निवडणुका लढण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयामुळे सत्ताधारी गटाला चांगलाच धक्का बसला आहे.अलई व अमृतकार यांनी गेल्या वर्षभरात बँकेच्या कुठल्याही कामकाजात हिताकडे किंवा बँकेच्या होणाऱ्या बैठकीला हजेरी न लावता चेअरमनपद सोडल्यानंतर बँकेकडे सपशेल पाठ फिरवित, बँकेच्या मंजूर आदर्श उपविधीतील मुद्दा क्र. ४५ मधील क्र.१२ चा भंग केल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नाशिक येथे बँकेच्या विरोधी गटाकडून दि. १२ जानेवारी २०२१ व दि. १८ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आली होती.अखेर जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८अ (१) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार दि. २०/०८/२०२१ पासून या आदेशाच्या दिनांकापासून समितीच्या पुढच्या एका कालावधीसाठी मुदत समाप्त होईपर्यंत कोणत्याही संस्थेच्या, कोणत्याही समितीचा सदस्य म्हणून पुन्हा निवडून येण्यास, पुन्हा स्वीकृत केले जाण्यास किंवा पुन्हा निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित केलेले आहे. बँकेच्या १७ संचालकांपैकी वेगवेगळ्या कारणांनी आतापर्यंत ७ संचालक अपात्र झालेले असल्याने आता कोणाची दांडी पडते याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.सुनावणीकडे पाठया तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालय, नाशिक येथे चौकशी व सुनावणीचे कामकाज वेळोवेळी झालेले असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कअ अन्वये बँकेचे संचालक राहण्यास अपात्रता येत असल्याने राजेंद्र बाळकृष्ण अलई व यशवंत निंबा अमृतकार यांना संचालक पदावरून कमी करण्याचा निर्णय दि. १८/०३/२०२१ रोजी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिला होता. मात्र दोन्ही संचालकांनी बँकेच्या हिताच्या दृष्टीने कामकाज न करता दुर्लक्ष करीत अहित ठेवले. म्हणून बँकेच्या विरोधी गटाकडून पुन्हा अपात्र संचालकांवर निवडणूक बंदी करण्याची मागणी एप्रिलमध्ये करण्यात आली असता, जिल्हा उपनिबंधक कार्यालयात या निवडणूक बंदीबाबत दोन्ही संचालकांना वेळोवेळी सुनावणीकामी संधी दिली; मात्र दोन्ही अपात्र संचालकांनी या सुनावणीकडे पाठ फिरवली. 

टॅग्स :bankबँकCrime Newsगुन्हेगारी