चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तालुक्याचा दौरा करत सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.मांढरे यांनी सीसीसी व डी.सी.एच.सी. बाबत माहिती जाणून घेतली. तसेच त्या ठिकाणी येणाºया रूग्णांना दिल्या जाणाºया सुविधा जसे वैद्यकीय उपचार, त्यांचे जेवण, स्वच्छता, सुरक्षा याबाबत आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत शहानिशा केली. तर या सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. याशिवाय उपजिल्हा रु ग्णालय येथील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये तात्काळ पर्यायी केंद्र सुरू करण्याबाबत व त्या ठिकाणी आॅक्सिजन पाईपलाईनचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले, कोरानाचे उपचार सुरू असताना इतर आजाराचे पेशंट यांना नियमित वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होतील यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घ्यावी तसेच उपजिल्हा रु ग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे माध्यमातून अशा रु ग्णांना उपचार उपलब्ध करून द्यावेत पॉझीटिव्ह रु ग्ण सापडल्यानंतर तयार केलेल्या कंटेनमेंट झोनमधुन कोणताही व्यक्ती बाहेर पडणार नाही किंवा बाहेरील व्यक्ती कंटेनमेंट झोन मध्ये प्रवेश करणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले.यावेळी उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, मुख्य अधिकारी अभिजीत कदम, पोलीस निरीक्षक चांदवड हिरालाल पाटील, किशोर कदम , कृषी अधिकारी राजेंद्र साळुंखे, तालुका डॉ.पंकज ठाकरे उपस्थित होते.आरोग्य विभागामार्फत कंटेनमेंट झोनमध्ये करण्यात येणाºया सर्वेबाबत मांढरे यांनी माहिती घेतली. यापूर्वी कुठलातरी आजार जसे दमा, कॅन्सर, मधुमेह आदि असलेल्या व्यक्तीकडे अधिक लक्ष देण्याबाबत सूचना दिल्या व अशा व्यक्तींना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांना तात्काळ सीसीसी किंवा डी.सी.एच.सी. येथे उपचारार्थ दाखल करण्याबाबत निर्देश दिलेत.
चांदवड कोविड सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:18 IST