शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शासनाकडून प्रकरणे मंजूर होऊनही येवल्यातील लाभार्थी वंचित

By admin | Updated: May 10, 2014 19:44 IST

येवला : तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील व अनु.जाती-जमातीच्या निवडक लाभार्थींची प्रकरणे मंजूर होऊनही निवड झालेल्या २२ लाभार्थींना अद्याप संकरित गायीचे वाटप झाले नाही, अशी तक्रार सायगाव, महालखेडासह ग्रामस्थांनी केली आहे.

येवला : तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील व अनु.जाती-जमातीच्या निवडक लाभार्थींची प्रकरणे मंजूर होऊनही निवड झालेल्या २२ लाभार्थींना अद्याप संकरित गायीचे वाटप झाले नाही, अशी तक्रार सायगाव, महालखेडासह ग्रामस्थांनी केली आहे.शासनाच्या वतीने अनु. जाती-जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, पशुधन वाढावे, दुग्धव्यवसाय वाढावा म्हणून विशेष घटक योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थींस ५० टक्के अनुदानावर सहा संकरित गायींचा गट घेऊन देण्याची योजना आहे. या योजनेसाठी येवला तालुक्यातील २२ लाभार्थींनी ५० टक्के रक्कम म्हणजेच एक लाख ७३ हजार रुपये, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात सहा महिन्यांपूर्वी जमा केले आहे.सायगाव, महालखेडा, नांदूर, गारखेडा, अंगुलगाव यासह अनेक गावांच्या लाभार्थींनी येवला पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागात अनेक वेळा वारंवार चकरा मारूनही संबंधित अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. लाभार्थींनी ५० टक्के अनुदानाची रक्कम भरल्यानंतर एका महिन्याच्या आत संकरित गायी घेऊन देणे बंधनकारक असतानाही तसे घडले नाही.संबंधित पशुसंवर्धन अधिकारी वेळकाढूपणाची भूमिका घेतात. वरिष्ठ कार्यालयाने या प्रकरणी लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाकडून सदरची रक्कम सुमारे ५२ लाख रुपये येवला पशुसंवर्धन तालुका अधिकारी यांच्याकडे वर्ग झाल्याचे समजते. परंतु एवढी मोठी रक्कम असल्याकारणाने, खरेदीचा व्यवहार गटविकास अधिकारी यांच्यामार्फत व्हावा व लाभार्थी लाभ द्यावा, असे पशुसंवर्धन अधिकारी यांचे म्हणणे असल्याचे समजते. परंतु, गटविकास अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या तू तू मै मैमध्ये लाभार्थी मात्र योजनेपासून वंचित राहत आहे.---बॉक्सया प्रकरणासंदर्भात पशुसंवर्धन उपायुक्तांशी चर्चा झाली आहे. सोमवारी कोपरगावच्या बाजारात अथवा लोणी प्रवराच्या बाजारात लाभार्थींना संकरित गायी खरेदी करून दिल्या जातील.- शिवांगी वसंत पवारसभापती,पंचायत समिती, येवला---