शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात डेंग्यूचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे.

नाशिक : राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे. दरम्यान, शहरातील तपमानात घट होत नाही तोपर्यंत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखणे महापालिकेपुढे आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे.  शहरात गेल्या आठ-दहा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णसंख्येत भर पडताना दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यात आतापर्यंत दीडशेहून अधिक रुग्ण डेंग्यू दूषित आढळले असून, जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत ही संख्या ४०० च्या पुढे गेली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये १३५ डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले होते, तर जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ७७५ रुग्ण डेंग्यू दूषित आढळून येऊन त्यातील चार रुग्णांचा बळी गेला होता. यंदा, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी, गेल्या काही दिवसांत त्यात भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सिडको भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने, दिवाळीच्या सुटीमुळे अनेक घरे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे घरांमध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच डेंग्यूची रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये सिडको विभागात सर्वाधिक ८० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेमार्फत ६२ पथकांद्वारे दर आठवड्याला अळीनाशक फवारणी, पाणी साठे तपासणी व अ‍ॅबेटिंगची मोहीम राबविली जात असून, ६ मोठी व २८ लहान धूरफवारणी यंत्राद्वारे फवारणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवाळी सुटी संपल्यानंतर आता गावाकडे परतलेले बांधकाम मजूर पुन्हा शहरात येत असून, बांधकामांची कामे सुरू होत आहेत. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी साठविल्या जाणाºया पाण्याकडेही लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.थंडीमुळे होणार प्रमाण कमीआता पावसाळा संपला असला तरी काही ठिकाणी पाणी साचलेले आहे. याशिवाय, अजून वातावरणात काही प्रमाणात उष्णतामान आहे. त्यामुळे सदर वातावरण हे डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक आहे. वातावरणातील तपमानात घट होत गेल्यानंतर डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आणखी आठ ते दहा दिवसांनी तपमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस आरोग्य विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे.