आमदार पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे की, कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुके असून, कळवण येथे आदिवासी विकास विभागाचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यान्वित आहे.
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजनांसह शिक्षणविषयक योजनांद्वारे शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह ही समूह योजना कळवण प्रकल्पात राबवली जाते. कळवण येथे शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे म्हणून सन २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून उच्च व तंत्रनिकेतन विभागाचा प्रस्ताव शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पडून आहे. निधीअभावी प्रस्तावास उच्च व तंत्रनिकेतन विभागाकडून मंजुरी मिळाली नाही. शासनस्तरावरून निधी व प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास शासनाच्या धोरणाचा फायदा आदिवासी अतिदुर्गम भागातील शैक्षणिक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना होईल व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार असल्यामुळे कळवणला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
फोटो - ०३ नितीन पवार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कळवण विधानसभा मतदारसंघात स्वागत करताना आमदार नितीन पवार. समवेत केदा आहेर, हरिश्चंद्र चव्हाण, बाळासाहेब क्षीरसागर आदी.
===Photopath===
030221\03nsk_21_03022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०३ नितीन पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कळवण विधानसभा मतदार संघात स्वागत करताना आमदार नितीन पवार, समवेत केदा आहेर, हरिश्चंद्र चव्हाण, बाळासाहेब क्षीरसागर आदी