नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेली विकासकामे व त्याचा योग्य वापर करून पर्वणीच्या काळात करावयाच्या नियोजनासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधारणत: गर्दी व नियोजनाशी संबंधित असलेल्या या कामांच्या जबाबदारीचे वाटप त्या त्या अधिकाऱ्यांच्या शिरावर देऊन त्यातून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधणे सहज होणार आहे. दोन दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या संदर्भातील सूचना पुढे आली. प्रत्येक विभागाने आपापली कामे पूर्ण केल्यानंतर या कामांचा वापर करते वेळी त्यात अन्य संबंधित यंत्रणांनाही त्यात सामावून घेण्याचे ठरविण्यात आले. म्हणजेच तपोवनात साकारणाऱ्या साधुग्रामचा वापर करते वेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाबरोबरच त्याठिकाणी सुविधा पुरविणाऱ्या पाणीपुरवठा, विद्युत विभाग, स्वच्छता विभाग अशा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमधून एका अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येईल व या अधिकाऱ्याच्या माध्यमातूनच संबंधित विभागाचा समन्वय व संपर्क राहील. जेणे करून अधिकारांचे विके्रंद्रीकरण करून प्रत्येकाला त्याची जबाबदारी पार पाडता येणे शक्य होईल.
नियोजनासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय
By admin | Updated: February 13, 2015 01:38 IST