शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

कोरोनामुळे पित्याचे अंतिम दर्शनही ऑनलाइन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:15 IST

सिडको : कोरोनामुळे दुसऱ्या शहरात निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन कोरोनाबाधित मुलाला अखेर व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाइन घ्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना सिडको येथे घडली. या घटनेला प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

ठळक मुद्देबघणाऱ्यांच्या डोळ्यातही या वेळी अश्रू अनावर

सिडको : कोरोनामुळे दुसऱ्या शहरात निधन झालेल्या वडिलांचे अंतिम दर्शन कोरोनाबाधित मुलाला अखेर व्हिडीओ कॉलद्वारे ऑनलाइन घ्यावे लागल्याची हृदयद्रावक घटना सिडको येथे घडली. या घटनेला प्रत्यक्ष पाहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाल्याचे चित्र बघावयास मिळाले.कोरोनाच्या या संकटकालीन परिस्थितीमध्ये अशी उदाहरणे बाहेर येत आहेत की जी ऐकून व बघून कठोरातील कठोर व्यक्तीच्या हृदयालादेखील पाझर फुटेल. असाच काहीसा प्रसंग नुकताच घडला की ज्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू आल्याशिवाय राहिले नाही. सिडकोत राहणारे राजेंद्र सूर्यवंशी गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने बाधित आहेत. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. अशातच जळगाव येथे राहणाऱ्या त्यांच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाल्याची वार्ता त्यांच्या कानावर आली. अशा वेळी त्यांना गावी जाणेही कठीण होते, परंतु वडिलांच्या अंत्यविधीला आपण जाऊ शकत नाही याची खंत मात्र त्यांच्या मनात सलत होती. अखेर त्यांच्या आप्तस्वकीयांनी वडिलांचे अंत्यदर्शन व्हिडीओ कॉलद्वारे करून देत त्यांची इच्छा पूर्ण केली. वडील व मुलाचे हे दृश्य पाहून बघणाऱ्यांच्या डोळ्यातही या वेळी अश्रू अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, जावई असा परिवार आहे.ज्या वडिलांनी आयुष्यभर आमच्या परिवारासाठी कष्ट केले, त्या वडिलांना मी खांदा देऊ शकलो नाही, याची सल माझ्या मनात कायम राहील. अशी वेळ कोणावरही येऊ नये. सर्वांनी या काळात आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.- राजेंद्र सूर्यवंशी, उत्तमनगर, सिडको

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल