नाशिक : नवीन विकास नियंत्रण नियमावलीतील अडचणी दूर करण्यासाठी नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांनाही नियमित जादा टीडीआर देण्यात येईल तसेच कपाटाचा प्रश्न यातच निकाली निघेल यांसह विविध प्रकारांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील विविध अडचणींबाबत सोमवारी (दि. २७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक बोलविली होती. यात शहराचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, डॉ. अपूर्व हिरे, सीमा हिरे तसेच बांधकाम आणि वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्या मंजूर झालेल्या विकास नियंत्रण नियमावलीत नऊ मीटरपेक्षा कमी म्हणजे सहा आणि साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांना टीडीआर आणि वाढीव एफएसआय लागू होणार नाही अशी तरतूद असल्याने विकासकच नव्हे तर नाशिककर हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सहा व साडेसात मीटर रस्त्यांच्या दुतर्फा अनुक्रमे १.५ व ०.७५ मीटर रुंदीकरण करून सदर लहान रस्त्यांना नऊ मीटर रस्त्याच्या नव्या नियमाप्रमाणे एफएसआय मिळणार आहे. त्याममुळे नवीन नियमावलीत तरतूद करण्यात आली आहेत. ९ जानेवारी रोजी नवीन विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आली आहे.
नाशिकच्या बांधकाम क्षेत्राला मिळणार दिलासा
By admin | Updated: February 28, 2017 02:18 IST