राज्यातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्य शासनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर १५ फेब्रुवारीपासून नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये टप्प्या-टप्प्याने सुरू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून तश्या सूचना महाविद्यालयांना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नेहमीच विद्यार्थ्यांची रेलचेल असलेल्या शहरातील महाविद्यालयांमध्ये पुन्हा वर्दळ वाढणार आहे. परंतु. त्यापूर्वी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कोरोना संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांकडून प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्राचार्य यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
कोट-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात पत्र प्राप्त सुरू झाले आहेत. त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्याची तयारी सुरू झाली असून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सोमवारपासून महाविद्यालये सुरू होतील.
-डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्राचार्य, केटीएचएम महाविद्यालय
पॉईंटर-
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये - २३५
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी -१ लाख २२ हजार
इन्फो
कोरोना नियमावलीचे पावन बंधनकारक
शिक्षण संस्थांना महाविद्यालये सुरू करताना कोविड १९ संदर्भातील केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. ताप, खोकला किंवा सर्दी असल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅन करावे लागणार असून विद्यार्थी, शिक्षक, सिक्षकेतरांना मास्कचा वापर करावा लागणार आहे.