पाटोदा (गोरख घुसळे ): सततच्या बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेकडो हेक्टरवरील कांदा पीक बाधित होऊन धोक्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. पीक वाचविण्यासाठी कांद्यावर औषध फवारणी करीत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी वर्गाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नकदी पीक म्हणून पाटोदा परिसरात कांदा पिकाची लागवड केली जाते. यावर्षी हजारो एकर क्षेत्रावर लागवड केलेला पोळ कांदा तसेच कांदा रोपे परतीच्या पावसाने पूर्णतः सडून गेल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले. असे असले तरी शेतकरी वर्गाने उपलब्ध होईल तेथून मिळेल त्या भावात कांदा बियाणे उपलब्ध करून उशिरा कांदा रोपे टाकून हजारो हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड केली. त्यासाठी एकरी सुमारे ७० ते ८० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल होत असून, सततच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे कांदा पिकावर मर, मावा व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे . (१० पाटोदा १/२)
................................
शेतात लागवड केलेला कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणातील बदलामुळे कांदा पूर्णतः पिवळा पडला असून, त्याची पूर्ण वाढ खुंटली आहे. शेतकरी वर्ग दुप्पट तिप्पट खर्च करून सकाळ संध्याकाळ महागड्या औषधांची मात्रा फवारणी करीत असूनही रोग आटोक्यात येत नसल्याने कांदा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
............................................
परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. लागवड केलेला सर्व कांदा व कांदा रोपे खराब झाल्याने नव्याने महागडे बियाणे उपलब्ध करून मोठया आशेने सुमारे दीड एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली; मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर मावा, मर व करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने कांदा पात पूर्णतः पिवळी पडली असून, वाढही खुंटली आहे. रोगावर नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी केली; मात्र रोग नियंत्रणात येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
- शिवाजी सांबारे, अक्षय सांबारे शेतकरी अंतरवेली
===Photopath===
101220\10nsk_10_10122020_13.jpg
===Caption===
१० पाटोदा १/२