नाशिक : छात्रभारती विद्यार्थी संघटनेकडून मराठा आरक्षणासाठी नाशिकमध्ये होणाऱ्या मूक आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आहे. छात्रभारती विद्यार्थी संघटनेची हुतात्मा स्मारक येथे रविवारी (दि. २०) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य संघटकांनी छात्रभारतीची भूमिका जाहीर करतानाच सोमवारी (दि.२१) मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला छात्रभारतीचे विद्यार्थी तरुण यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देतानाच छात्रभारतीच्या मागणीचे पत्र, तसेच मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र आंदोलन स्थळी देण्यात येणार असल्याची माहिती छात्रभारतीचे राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, राज्य संघटक समाधान बागुल, शहराध्यक्ष देविदास हजारे, उपाध्यक्ष आम्रपाली वाकळे, सदाशिव गणगे, आशिष कळमकर, साहिल मनियार, अपूर्वा मोगलाईकर, भारत घोंगडे, रोहन पगारे, समाधान आहेर, शुभम ढेरे यांनी केले आहे.
मराठा आरक्षण मूक आंदोलनाला छात्रभारतीचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST