नाशिक : वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून २० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सचिन सुरेश जाधव (रा़ कहार गल्ली, येवला) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शुक्रवारी (दि़ २१) रंगेहाथ पकडले होते़ त्यास शनिवारी (दि़२२) जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून, दोन महिन्यांपूर्वीही संबंधित ठेकेदाराचा ट्रक सचिन जाधव याने अडविला होता. यावेळी तक्रारदारास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दूरध्वनीनंतर सोडल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. दरम्यान, त्यानंतर जाधव याने वाळूचा व्यवसाय करायाचा असेल तर उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांचे नाव सांगून त्यांना दरमहा वीस हजार रुपये आणि आपले एक हजार रुपये असा २१ हजार रुपयांचा हप्ता सुरू करण्यास सांगितल्याचे तक्रारदारांचे म्हणणे असून, तसे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळविले होते़ (प्रतिनिधी)यानंतर संशयित जाधवने तक्रारदारास फोन करून २० हजार रुपये लाचेची मागणी केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी सापळा लावण्यात आला़ शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास येवला उपविभागीय कार्यालयासमोरील वाहनतळावर तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाधवला अटक केली होती़ (प्रतिनिधी)
उपविभागीय अधिकाऱ्याच्या नावाने लाच मागणाऱ्यास कोठडी
By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST