शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नांदूरशिंगोटे येथे यात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:48 IST

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. हजारो भाविकांनी यात्रेस हजेरी लावली.

ठळक मुद्देविविध कार्यक्रम : हजारो भाविकांची हजेरी; मंदिर परिसरात रोषणाई

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. हजारो भाविकांनी यात्रेस हजेरी लावली.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्यदैवत असणारे श्री रेणुकामाता परिसरातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पौष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे शुक्र वारी यात्रेस प्रारंभ झाला. यात्रोत्सव समितीच्या वतीने मंदिर परिसरात सुशोभीकरण आणि मंदिरसंकुलावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रामुख्याने मंदिर संकुलात असणाºया रेणुकामाता मंदिरासह विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्त महाराज, साईनाथ महाराज, श्रीराम, खंडेराव महाराज यांच्या गाभाºयात आकर्षक गुलाबपुष्पांची सजावट केली आहे. सकाळी ९ वाजता देवीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीला हिरवे पातळ, हिरव्या बांगड्यांचा चुडा, अलंकार व नथ चढविण्यात आली. यावेळी रेणुकामातेची विधिवत पूजा करून ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. सकाळपासूनच परिसरातील भाविकांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी झाली होती.यात्रेच्या दुसºया दिवशी म्हणजे शनिवारी (दि.२८) रोजी मंदिरासमोर हजेरीचा कार्यक्रम पार पडला. गावातील व पंचक्रोशीतील महिलांंनी नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री करमणुकीसाठी संगीता महाडिक यांचा लोकनाट्य तमाशा पार पडला. यात्रेत मिठाईवाले, खेळणीवाले, कटलरी दुकाने थाटण्यात आली होती. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.कुस्त्यांची दंगल रंगलीरेणुकामाता यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल हे येथील एक खास आकर्षण असते. कुस्त्यांच्या दंगलीसाठी नगर, कोल्हार, नेवासा, कोळपेवाडी, अकोला, नाशिक, अंबड, निफाड, संगमनेर, सिन्नर, अकोले येथील तसेच परिसरातील नामांंकित कुस्तीगिरांनी हजेरी लावली. जवळपास १०० च्या आसपास कुस्त्या झाल्या. विजेत्यांना शंभर रु पयांपासून तर एकवीसशे रुपयां- पर्यंतच्या पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आली. यावेळी प्रथमच महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावत स्पर्धेत सहभाग घेतला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक