शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

भोजापूर’चा गाळ उपसण्याची आवश्यकता

By admin | Updated: May 19, 2017 00:54 IST

साठवण क्षमतेत घट : शासनासह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज‘

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरशिंगोटे : तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या भोजापूर धरणात प्रचंड गाळ साचला असल्याने त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. धरणाच्या निर्मितीपासून एकदाही गाळ उपसण्यासाठी प्रयत्न झाला नसल्याने पाण्यापेक्षा गाळ अधिक अशी स्थिती आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी भोजापूरमधील गाळ उपसण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.या धरणातील गाळ काढल्यास पाण्याची साठवण क्षमता वाढून धरणाच्या सिंचन लाभक्षेत्रातील शेती ओलिताखाली येऊ शकेल. मात्र त्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. नाशिक-पुणे महामार्गापासून १३ किलोमीटर अंतरावर व अकोले तालुक्यातल्या पाचपट्टा परिसरात उगम पावणाऱ्या म्हाळुंगी नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. ३६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे मातीचे धरण सन १९७२ च्या दुष्काळात पूर्ण झाले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक, पाटबंधारेमंत्री शंकरराव चव्हाण व आमदार रुक्मिणीबाई वाजे यांच्या उपस्थितीत धरणाचे भूमिपूजन झाले होते. भोजापूर धरणाची लांबी ४८० मीटर असून, नदीपासून उंची ३८ मीटर आहे. डावा तट कालवा अंदाजे १८ किलोमीटरच्या आसपास आहे. धरणाचा १२१ दशलक्ष घनफूट निरुपयोगी पाणीसाठा आहे. या धरणावर रब्बी व खरीप हंगामात सुमारे ४००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तसेच भोजापूर धरणावर सिन्नर तालुक्यातील मनेगावसह १७ गावे व कणकोरीसह पाच गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आहे, तर संगमनेर तालुक्यातील गावांसाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. हजारो लोकांची तहान भागविणाऱ्या व हजारो एकर शेतीला पाणी पुरवणाऱ्या धरणामुळे परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. तसेच उन्हाळ्यातील उपाययोजना म्हणून परिसरातील पाझर तलाव, बंधारे याच धरणाच्या पाण्याने भरले जातात. पावसाळ्याच्या दिवसात दोन-दोन महिने पूरपाणी सुरू असते. तसेच यातून उपसा जलसिंचन योजनेला पाणी दिले जाते. भोजापूर धरणाचे पात्र मोठे असल्याने पाण्याचा परिसर मोठा आहे. परिसराला वरदान ठरलेल्या धरणातील गाळ काढला गेलेला नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असते. गाळ साचल्यामुळे धरणाची जेवढी क्षमता आहे तेवढेही पाणी राहत नाही. धरण परिसरात जागोजागी मातीचे ढिगारे उभे राहिले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होते. गाळ साचल्यामुळे पाण्याला वेगळाच दर्प येतो. धरणातील गाळ काढला गेल्यास पाण्याची क्षमता वाढून मोठ्या प्रमाणात साठा होऊ शकतो.पूर्वी रब्बी हंगामात दोन आवर्तनांमध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाल्याने व गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली असून, शेतकऱ्यांना यातून कसेबसे एकच आवर्तन मिळत आहे. तेही लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.भोजापूर धरण नांदूरशिंगोटे व तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरले आहे. धरणाच्या पाण्यावरच परिसरातील शेती अवलंबून आहे. परंतु गेल्या पाच वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे या भागातील शेती व्यवसाय संकटात सापडला आहे.