पिंपरवाडी (यशवंतनगर) येथे बहुतेक शेतकऱ्यांनी भारती एक्सा कंपनीचा पीक विमा उतरवला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, संबंधित कंपनीच्या एजंटने हितसंबंध जपत नुकसान नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना या विम्याची तक्रार करूनही संबंधित कंपनीच्या विमा एजंटने पीक विम्यापासून वंचित ठेवले. त्यांची तातडीने चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी येथील शिष्टमंडळाने तहसीलदार कोताडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा कृषी अधिकारी नाशिक, तालुका कृषी अधिकारी, कामगार तलाठी आदींना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी विजय गुरुळे, विष्णू गायकवाड, हरिभाऊ कापसे, नवनाथ गायकवाड, रवींद्र गुरुळे, संपत शिंदे, किरण शिंदे, पोपट गुरुळे, मंगेश काकड, सुधाकर काकड, सविता काकड, शिवाजी काकड, रघुनाथ शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो - २० सिन्नर फार्मर
पिंपरवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना शेतकरी.