शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मिरज पूर्वमध्ये केळी उत्पादक संकटात

By admin | Updated: April 30, 2015 00:24 IST

दर घसरला : परराज्यातून आयात, जादा उत्पादनामुळे उठावही घटला

सुशांत घोरपडे - म्हैसाळ -केळी उत्पादनातील नफा पाहून मिरज पूर्वभागातील अनेक शेतकरी केळी उत्पादनाकडे वळले खरे, पण केळीच्या दराबाबतच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. सध्या दर पडल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात केळीचा दर चढताच असला तरी घाऊक बाजारात मात्र शेतकऱ्यांना मिळणारे पैसे तुटपुंजे आहेत. परिणामी कर्जे काढून केळी लागवडीकडे वळलेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात आहेत.केळी उत्पादनात एक एकर लागवडीसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. उत्पादन व्यवस्थित मिळाल्यास व त्याला योग्य दर मिळाल्यास त्यापासून लाखो रुपये उत्पन्न मिळू शकते. हे आर्थिक गणित लक्षात आल्याने मिरज पूर्व भागातील म्हैसाळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बॅँका, पतसंस्था, सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन केळी लागवड केली. उत्पादन खर्च जरी जास्त असला तरी, देखभालीचा फारसा त्रास नसल्याने, तसेच नैसर्गीक आपत्तीचाही फारसा परिणाम होत नसल्याने शेतकरी धाडसाने केळीलागवडीकडे वळले. मात्र सध्या उत्पादनक्षमता जास्त असून, बाजारपेठेत केळीला मागणी कमी आहे. केळीला सहा महिन्यांपूर्वी प्रतिकिलो १२ ते १४ रुपये दर होता, सध्या तो तीन ते चार रुपयांपर्यंत घसरला आहे.बाजारपेठेत सर्वसामान्य ग्राहक ज्या दराने केळी खरेदी करतो, त्या केळीचे दर वाढले आहेत. केळीपासून बनविण्यात येणारे चिप्स, पापडी आदी उपवासाच्या पदार्थांच्याही किमती गगनाला भिडल्या आहेत. मग शेतकऱ्यांनाच दिला जाणारा दर कमी कसा, असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.त्यातच माल घेऊन जाण्यासाठी व्यापाऱ्यांना दिवसातून अनेक वेळा विनवावे लागते, पण व्यापारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. माल घेण्यासाठी आलेच, तर एकदम कमी दराने माल खरेदी करतात. काही व्यापारी तर केळी परराज्यातून मागवत असल्याची चर्चा आहे. म्हैसाळ येथील मनोज जाधव या प्रगतशील शेतकऱ्याने जवळपास २९०० केळीची रोपे दर नसल्यामुळे परत पाठवली आहेत.दलालांची मक्तेदारी...एकेकाळी आरग, बेडग, म्हैसाळ हा पट्टा पानमळ्यांसाठी प्रसिध्द होता. म्हैसाळ योजनेचे पाणी आले खरे, पण दूषित पाण्यामुळे पानांची मुळे कुजू लागल्याने हळूहळू पानमळे निघाले आणि ऊस वाढला. ऊस घालविण्यासाठीचा त्रास, दराची आंदोलने, पैसे वेळेवर नाहीत, या वैतागातून येथील धाडसी शेतकरी द्राक्षबागांकडे वळले, मात्र त्यामध्येही निसर्गाची साथ फारशी लाभत नसल्याने कमी जोखमीचे, शाश्वत व हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी केळी लागवडीकडे वळला आहे. मात्र आता केळीचे उत्पादन वाढल्याने मालाला बाजारात उठाव नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शिवाय येथेही दलालांची मक्तेदारी वाढल्याने अपेक्षित दर मिळत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.