कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी मीनल करणवाल, महिला व बालविकास विभाग सभापती निर्मला राऊत, युनिसेफ राज्य सल्लागार डॉ. गोपाल पंडगे, पांडुरंग सुदामे, महिला व बालविकास विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी रंजीत कुऱ्हे, आदी उपस्थित होते.
देशातील समग्र पोषणावर आधारित महत्त्वपूर्ण कार्यक्रम महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पोषण अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या पोषण अभियानाअंतर्गंत खालीलप्रमाणे निदेर्शांक साध्य करण्याचे निर्धारित करण्यात आलेले आहे.
० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांमधील खुजे/बुटकेपणाचे, तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करणे. ६ ते ५९ महिने वयोगटांतील बालकांमध्ये रक्ताल्पता यांचे प्रमाण कमी करणे.
१५ ते ४९ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुली/महिला यांच्यामधील रक्ताल्पता कमी करणे.
जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे. केंद्र शासनाने पोषण अभियानांतर्गत जन आंदोलन हा महत्त्वाचा भाग आहे.
या कार्यक्रमांतर्गंत सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येत आहे. पोषण माह मध्ये विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाद्वारे समन्वय साधून सहभाग घेण्यात येणार आहे.
रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यातील कुपोषण आणि कुपोषण संदर्भात करण्यात येणाऱ्या विशेष शोधमोहीमेविषयी अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करीत कुपोषित बालकांचा शोध नियमित घेणे आणि त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यासाठी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे माहे जून व जुलै २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या सॅम आणि मॅम बालकांच्या शोधमोहिमेत शून्य टक्के सॅम असलेल्या अंगणवाडी केंद्राची आणि २० टक्क्यांपेक्षा अधिक गैरहजर असलेल्या अंगणवाडी केंद्राची पुनश्च स्क्रिनिंग (सॅम व मॅम बालक शोधमोहीम) करण्यात येणार असल्याचे सांगितले,
तर सीमा वळवी यांनी प्रशासनासोबतच पदाधिकारी यांनी समन्वयातून कुपोषण निर्मूलन करूया असे आवाहन केले.
राज्य सल्लागार युनिसेफ डॉ. गोपाल पंडगे, पांडुरंग सुदामे यांनीही मार्गदर्शन केले.