भूषण रामराजे ।लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : बोटावर मोजण्याएवढय़ाच शिल्लक गिधाडांच्या संवर्धनासाठी वनविभागाने तीन वर्षापूर्वी सुरू केलेला ‘खाणावळ’ प्रकल्प अखेर बंद पडला आह़े वनविभागाची उदासिनता या प्रकल्पाच्या बंद पडण्याचे प्रमुख कारण असून यामुळे गिधाडे नष्ट होण्याची भिती आह़े नंदुरबार जिल्ह्यात सोजरबार ता़ तळोदा येथील वनक्षेत्रात चार वर्षापूर्वी गिधाडांचा रहिवास आढळून आला होता़ या गिधाडांचे संवर्धन करण्याकरिता वनविभागाने खाणावळ प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता़ साधारण साडेचार लाख रूपये निधी असलेल्या या प्रस्तावात गिधाडांचा रहिवास असलेल्या क्षेत्रात तारेचे कुंपण करणे, प्रस्तावित जागी उंचवटा तयार करून मेलेले जनावर टाकून ते सुरक्षित राहील अशी चौकट तयार करणे यासह विविध बाबी प्रस्तावित होत्या़ परंतू वनविभागाने चार वर्षात वेळोवेळी चर्चा करून प्रस्ताव अडवून ठेवला़ गिधाडांच्या संवर्धनासाठीच्या या प्रकल्पामुळे गिधाडांच्या वेळोवेळी नोंद होऊन उपाययोजना करता येणे शक्य होणार होत़े परंतू वनविभागाच्या उदासिन कारभारामुळे ही खाणावळ सहा महिने चालवून बंद पडली आह़े 9 हजार 800 हेक्टरवर पसरलेल्या तळोदा वनक्षेत्रात 2015 मध्ये करण्यात आलेल्या पक्षीगणनेवेळी सोजरबार परिसरात 10 गिधाडांचा समूह वनविभागाच्या कर्मचा:यांना दिसून आला होता़ मोठय़ा संख्येने दिसून आलेल्या गिधाडांच्या संगोपनासाठी वनविभागाकडून ‘खानावळ’ प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता़ यानुसार गावशिवारात नैसर्गिकरित्या मरण पावलेल्या पाळीव गुरांना आणून टाकले जाणार होत़े यामुळे गिधाडांना अन्न मिळून ते नामशेष होण्याचा धोका कमी होणार होता़ यानंतर सहा महिन्यांनी याठिकाणी उपक्रम सुरू झाल्याचे सांगण्यात आल़े काही दिवस सुरू असलेला हा उपक्रम आता पूर्णपणे बंद झाला असून गिधाडांची संख्या ही सहा झाली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आह़े याबाबत वनविभागाला विचारणा केली असता, निश्चित संख्या मिळू शकलेली नाही़ वनातील कचरा स्वच्छ करणारे गिधाडेच वनातून साफ होण्याची वेळ येऊनही वनविभाग मात्र निधीच्या प्रतिक्षेत असल्याचे उघड झाले आह़े तळोदा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन वर्षात येथील गिधाडांची संख्या मोजण्याचे धारिष्टय़ दाखवलेले नसल्याचे सांगण्यात येत आह़े वनविभागाचे अधिकारी गिधाडांची विष्ठा पाहून त्यांच्या जीवन मरणाचा तपास लावत असल्याचे सांगण्यात येत आह़े याबाबत तळोदा वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांच्याकडून माहिती घेतली असता, ते म्हणाले की, सोजरबारची खाणावळ अद्यापही प्रस्तावित आह़े याठिकाणी गिधाडांचा रहिवास आह़े त्यांच्या विष्ठेवरून याठिकाणी गिधाडांचा थवा असल्याचे निश्चित होत़े परंतू त्यांची संख्या स्पष्ट झालेली नाही़ वनविभागाकडून वनक्षेत्रातील गिधाडांच्या संख्येत वाढ करणे आणि खाणावळ प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहेत़ गिधाडांच्या खाणावळीसाठी सर्वप्रथम 2015 मध्ये तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक पाटील यांनी 4 लाख 50 हजार रूपये या माफक खर्चात प्रस्ताव तयार केला होता़ हा प्रस्ताव तळोदा मेवासी वनविभागाकडे पाठवण्यात आला होता़ दोन दिवसातून एकवेळ किंवा आठवडय़ातून किमान 4 वेळा याठिकाणी मेलेल्या गुरांचे शरीर टाकण्याची योजना होती़ यासाठी स्थानिक वनसंरक्षण समित्यांची मदत घेण्यात येणार होती़ त्याला तळोदा तालुक्यातील काही वनसरंक्षण समित्यांनी अनुकुलता दर्शवत हिरवा कंदील दिला होता़ या प्रस्तावानुसार समितीच्या पुढाकाराने नियोजित जागी मयत जनवारांना टाकण्याचे काम सहा महिन्यार्पयत झाल्याची माहिती आह़े मात्र वनविभागाने या प्रस्तावासाठी निधीच नसल्याचे सांगून लालफितीची आडकाठी घातल्याने खाणावळ बंद झाली आह़े येत्या काळात हा प्रकल्प सुरू होणार किंवा कसे याबाबतही वनविभागाकडे स्पष्ट माहिती नाही़
तळोद्यातील सोजरबारची ‘गिधाड खाणावळ’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 13:00 IST