शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांचा प्रस्तावाबाबत पंचायत समित्यांची उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : ग्रामीण भागातील नागरिकांचे वैयक्तिक शौचालयाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्ह्यातील पंचायत समित्यांनी उदासिन भूमिका घेतली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : ग्रामीण भागातील नागरिकांचे वैयक्तिक शौचालयाचे प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्ह्यातील पंचायत समित्यांनी उदासिन भूमिका घेतली असून, हे प्रस्ताव जिल्हा परिषदकडे तातडीने पाठविण्याचे आदेश प्रशासनाने पंचायत समित्यांना दिले आहे. अन्यथा कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकही कुटुंब वैयक्तिक शौचालयापासून वंचित राहू नये म्हणून अशा सर्व कुटुंबांना शौचालये उपलब्ध करून देण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सहाही पंचायत समितीच्या प्रशासनाला महिना-दीड महिन्या पूर्वी व्हीडीओ काॅन्फरन्सने आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींचे शौचालयाचे प्रस्ताव पाठविण्याची सूचना प्रशासनाने केली होती. तथापि याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यवाही न करता उदासिन धोरण घेतल्याचे नमूद करत प्रस्ताव पाठविले नसल्याचा प्रशासनाने ठपका ठेवला आहे.शौचालयांसाठी प्रशासनाने पुन्हा सर्व पंचायत समित्यांना प्रस्ताव पाठविण्याचे सूचित करून संबंधित कुटुंबाने यापूर्वी शौचालयाचा लाभ न घेतल्याची खात्री करावी. शिवाय नव्याने वाढलेल्या शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालय उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींची मान्यता घ्यावी. त्याच बरोबर कुटुंबाचे नाव दुबार होणार नाही याची दक्षता घ्यावी. ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्यात आलेल्या कुटुंबांना कोणत्याही स्थितीत वगळण्यात येणार नसल्यामुळे कुटुंबांची माहिती ऑनलाईन पाठविताना तालुका कक्षाने प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी. जी कुटुंबे शासनाच्या शौचालय योजनेपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती प्रशासनाची राहील. त्याबाबत कार्यवाही करण्याचा इशारादेखील जिल्हा परिषद प्रशासनाने दिला    आहे.वास्तविक ग्रामीण भागात आजही बहुसंख्य कुटुंबे शौचालया विना आहेत. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव उघड्यावर शौचालयास जावे लागत असल्याचे चित्र आहे. या कुटुंबांचे प्रुख शौचालयाच्या मागणीसाठी सातत्याने संबंधित ग्रामपंचायती अथवा पंचायत समितीकडे थेटे घालत असतात. एवढे करूनही त्यांना दाद दिली जात नाही. अनुदान नसल्याचे या लाभार्थ्यांना सांगितले जाते. दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासन शौचालयांचे प्रस्ताव पाठविण्याबाबत पंचायत समित्यांना स्मरण पत्रे पाठवितो. म्हणजे अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या उदासिन भूमिकेमुळे लाभार्थ्यांना शौचालयाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. आता तरी या दोन्ही यंत्रणांनी उदासिनता झटकून युद्ध पातळीवर अशा कुटुंबांचे प्रस्ताव तयार करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

शासनाकडून देण्यात येणारे शौचालयाचे अनुदान अत्यंत तुटपुंजे आहे. कारण प्रत्येक शौचालयास शासनाकडून १८ हजाराचे अनुदान दिले जाते. परंतु शौचालयाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य दगड, विटा, सीमेंट, लोखंड, अत्यंत महागडे असते. एवढ्या अनुदानात ते पुरेसे ठरू शकत नाही. लाभार्थ्यांना स्वस्ता उधार-उसनवारी पैसे घेऊन त्यात टाकावे लागत असते. लाभार्थी पैशांअभावी असे तकलाडू शौचालय उभारत असतो. त्यामुळे त्याचा वापरदेखील केला जात नसल्याचे चित्र आहे. साहजिकच शासनाच्या शौचालय योजनेचा हेतूदेखील सफल होत नाही. आजही ग्रामीण भागात बहुसंख्य ठिकाणी शौचालये असेच धुळखात व त्यात जनावरांचा चारा भरल्याचे विदारक चित्र दिसून येते. अशा वस्तुस्थितीमुळे शासनाने शौचालयाच्या अनुदानात भरीव वाढ करण्याची आवश्यकता आहे. तशी मागणीदेखील होत आहे.