लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापूर शहरातील नया होंडा भागात पाहून थुंकल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी चाैघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूरातील रंगावली नदी जवळील नया होंडा पुलाजवळ राहणारा सतीष श्रावण मोरे हा सोमवारी सकाळी थांबला होता. याठिकाणी भरत मोरे याने जावून माझ्याकडे जावून का थुंकला असा वाद घालत मारहाण करण्यास सुरूवात केली होती. यावेळी संतोष मोरे, शरद मोरे या तिघांनिही सतीष मोरे यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यात त्याच्या डोक्याच्या मागील भागात दुखापत झाली होती. याप्रकरणी सतीष मोरे यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चाैघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर येथे थुंकल्याच्या कारणातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:05 IST