शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

९५ हजार नागरिकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून बुधवारी एकाच दिवसात ९५ हजार ३९१ नागरिकांची आरोग्य  तपासणी करण्यात आली. आतापर्यंत एकूण दोन लाख ९५ हजार २५८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक गावात आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती, एएनएम आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्येक व्यक्तीचा ताप आणि आक्सिजन पातळी मोजण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्यास अन्य आजार असल्यास त्याची नोंद घेण्याबरोबरच कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.एकूण  ४८२ पथकामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येत असून आज २२ हजार १५६ घरांना भेटी देण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ६७ हजारापेक्षा अधिक घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे.  त्यात नंदुरबार तालुक्यातील ५६ हजार ३५१, अक्कलकुवा २२ हजार ८१२, धडगाव ४८ हजार ४८४, नवापूर ६० हजार ८५६, शहादा ६९ हजार ७१० आणि तळोदा तालुक्यातील ३७ हजार ४५ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तातडीने स्वॅब तपासणी करून त्यांना कोविड केअर सेंटरला संदर्भित करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाची संपर्क साखळी खंडीत होण्यात मदत होऊ शकेल.जि.प.सीइओंची भेटजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नवापूर तालुक्यातील मोठे कडवान येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांना मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत वसावे, विस्तार अधिकारी दिलीप कुवर, सरपंच बंधू गावीत उपस्थित होते. गौडा यांनी आॅक्सिमीटरद्वारे आॅक्सिजन पातळी मोजणे व थर्मल गनच्या योग्य वापराविषयी मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकांची नीट नोंद घ्यावी, आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.